बॉक्स
तिजोरीवरील बोझा कमी होणार
या शोध मोहिमेत प्रत्येक गावातील अपात्र लोकांची तपासणी होणार असल्याने खरे लाभार्थी निश्चित होण्यास मदत होईल. शिवाय श्रावणबाळ व वृद्धापकाळ लाभार्थ्यांचा आकडा कमी झाल्याने शासनाच्या तिजोरीवरील प्रती माह लाखोंचा बोजा कमी होणार आहे. बोगस लाभार्थ्यांमध्ये महिलांचाही समावेश आहे. परंतु अनेक विवाहित महिलांचे माहेर हे तालुका व जिल्हा बाहेरील आहेत. यांच्या जन्माचे दाखले सुद्धा बाहेर गावातील शाळांमध्ये आहेत. त्यामुळे या तपासणी मोहिमेला अडचणी येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या तपासणीत पुरुषांचा पत्ता मोठ्या प्रमाणात साफ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोट
'मोहाडी तालुक्यातील श्रावणबाळ, वृध्दापकाळ योजनेतील अपात्र लाभार्थी लाभ घेत असून पात्र लाभापासून वंचित असल्याबाबतच्या अनेक तकारी प्राप्त झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने अपात्र लाभाथ्यांची शोध मोहीम सुरूकेली असून संबंधीत गावच्या शाळेतील दाखला खारीज नोंदवहीतील जन्मतारखेची पडताळणी करून लाभार्थ्यांच्या पात्र/अपात्रतेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सदर तपासणी कामात शासकीय यंत्रणेला मदत करावी.'
- मीनल करनवाल, तहसीलदार मोहाडी