लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोली विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाºया लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील शेतातील पिकावर आलेल्या मावा व तुळतुळा या शेतामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. शेतकºयांना ही नुकसान मिळावी यासाठी आ. बाळा काशीवार यांनी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांची भेट घेऊन समस्या मांडली.आ.काशीवार यांनी कृषी अधिकाºयासोबत साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील शेतीची पाहणी केली व कृषी अधिकाºयांशी चर्चा केली. यात धानाला मावा व तुडतुडा या रोगाची लागण झाल्यामुळे पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. शेतकºयांना ही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी आ.काशीवार यांनी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांना समस्या सांगितली यावर कृषी मंत्र्यांनी शेतकºयांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिल्याची माहिती आ. काशीवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
शेतकºयांना नुकसान भरपाई मिळून देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:05 AM
साकोली विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाºया लाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील शेतातील पिकावर आलेल्या मावा व तुळतुळा या शेतामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले.
ठळक मुद्देकाशीवार यांचे कृषीमंत्र्यांना साकडे