विशाल रणदिवे ।आॅनलाईन लोकमतअड्याळ : अड्याळ ग्रामीण रुग्णालयाचे नामकरण तेव्हापासून ते आज पावेतो रिक्त पदाचे ग्रहण सुटता सुटेना. पदभरती व्हावी म्हणून व अतिआवश्यक तात्काळ सेवा देणारी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका मिळावी अनेक कार्यकर्त्यांनी याआधी शक्तीपणाला लावली पण यश आले नाही.ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे रोजच रुग्णांची गर्दी होत असते. परंतु त्या गर्दीच्या मानाने सेवा देणाºयांची संख्या मात्र अल्प आहे. अड्याळ व परिसरातील जवळपास ८० ते ५० गावातील रुग्ण औषधोपचारासाठी येतात.त्यात एक भाग लहान मोठे अपघातग्रस्त रुग्णांना सुद्धा प्रथमोपचारासाठी ईथेच आणल्या जाते. जर का एखादेवेळी पाच दहा अपघातातील रुग्ण आले तेव्हा नेहमीच डॉक्टरांची कमतरता भासते.रूग्णालयल स्वच्छतेसाठी सत्य साईसेवा समितीने पुढाकार घेतला आणि वर्षातून एकदा ग्रामीण रुग्णालय परिसराची स्वच्छता करते. बाकी काळात अस्वच्छताच पाहायला मिळते. अड्याळ येथील रुग्णालयात कार्य भरपूर असतानाही त्या मानाने मात्र कर्मचारी उपलब्ध नसताना सुद्धा या रुग्णालयात सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, अधिपरिचारिका काम करताना दिसतात.या संपूर्ण रुग्णालयातील सर्व माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांना दर महिन्याच्या मासिक सभेत दिली जाते. यासोबतच जिल्ह्यातील संपूर्ण रूग्णालयाची माहिती त्यांना दिल्या जाते. रिक्त पदांची माहिती मिळून सुद्धा काहीच होत नसेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.दर महिन्याला मिटींग घेणे त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करून रिक्तपद जर भरल्या जात नसतील तर बाकीच्या कामाचे काय होत असणार हाही एक प्रश्नच आहे. याला क्षेत्राचे आमदार रामचंद्र अवसरे व खासदार नाना पटोले सुद्धा जबाबदार असल्याचीही चर्चा अड्याळ व परिसरात होत आहे.३१ आॅगस्ट २०१५ ची स्थिती अद्याप कायमअड्याळ ग्रामीण रुग्णालयाकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचा पुरावा म्हणजे रुग्णालयातील पदाची स्थिती दर्शवणारा तक्ता यात २०१५ पर्यंत जी स्थिती होत ती आजही कायम आहे. दोन वर्ष उलटून सुद्धा यात कुठलीही सुधारणा जर होत नसेल तर याला काय म्हणायचे. अड्याळ ग्रामीण रुग्णालयाचे नाव मोठे असले तरी सुद्धा याकडे दुर्लक्षच महत्वाचे म्हणजे या रुग्णालयातील रिक्त पदांमुळे ईथे येणाºया रुग्णांना तर त्रास होतच आहे. परंतु दुसरीकडे सेवा देणाºया डॉक्टरांचे, कर्मचाºयांचे सुद्धा हालचे बेहाल होत आहे.१५ दिवसापासून रात्रंदिवस एकच डॉक्टर कामावरग्रामीण रुग्णालय अड्याळ येथील सध्या कामावर असणारे डॉक्टरांची बदली कोणाची कधी कुठे होणार याची काहीच शास्वती नाही. मग या रुग्णालयातील रिकाम्या जागी दुसरी डॉक्टर नावाची व्यक्ती येईल याची मात्र काही शास्वती नाही त्याचे बोलके उदाहरण म्हणजे डॉ. एम.एस. राऊत, वैद्यकीय अधिकारी हे सामान्य रुग्णालय भंडारा येथून ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले यांच्या सोबतीला डॉक्टर सुयोग कांबळे हे ते गेल्यानंतर डॉ. एम.एस. राऊत यांना आता रात्रंदिवस एकट्यालाच काम पाहावे लागत आहे. या डॉक्टरचे आरोग्य आता धोक्यात आले आहे.पुरूष प्रसाधनगृह चार महिन्यापासून कुलूप बंदअड्याळ ग्रामीण रुग्णालयातील बाहेरून येणाºयांसाठी स्वच्छ व सुंदर पुरूष प्रसाधानगृह गेली चार महिन्यापासून कुलूप बंद आहे. आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना याचा त्रास तर होतच आहे. परंतु याकडे येथील रुग्ण समितीचे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. रुग्ण समितीमधील एकाही पदाधिकाºयाला ही बाब आजपावेतो लक्षात आलीच नाही कि याकडे कानाडोळा करण्यात आला हाही एक प्रश्नच आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी मात्र प्रसाधनकृह सुरू करण्याची मागणी केली आहे.
अड्याळ ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदांचे ‘ग्रहण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:26 AM
अड्याळ ग्रामीण रुग्णालयाचे नामकरण तेव्हापासून ते आज पावेतो रिक्त पदाचे ग्रहण सुटता सुटेना.
ठळक मुद्देरूग्णसेवा प्रभावित : नागरिकांना अनेकदा उपचाराअभावी परतावे लागते