जिल्ह्यातील १४५ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले यात ८०.९५ टक्के मतदान झाले होते. या ग्रामपंचायत निवडणुक मतदानात महिलांनी हिरिरीने भाग घेतला होता. जिल्ह्यात ९८ हजार ६१० महिला मतदारांपैकी ८० हजार ९६६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी तीन ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध झाली. शुक्रवारी १४५ ग्रामपंचायतसाठी ४६८ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. यात एक लाख ९९ हजार ६१७ मतदारांपैकी १ लाख १ हजार ६५ हजार ५७५ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सोमवारी या सर्व तालुकास्थळी ग्रामपंचायत निवडणुकीत अंतर्गत मततमोजणी पार पाडली जाणार आहे. यात सातही तालुके मिळून ६० टेबलवर ही मतमोजणी पार पडणार आहे. या अंतर्गत ६६ मतमोजणी सुपरवायझर, १३२ मतमोजणी सहायक, ६६ शिपाई असे एकूण २६४ कर्मचारी ही जबाबदारी पार पाडणार आहेत. दरम्यान, कुठलीही अनुचित घटना किंवा प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिसांनीही मतमोजणी केंद्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
बॉक्स
असे झाले होते मतदान
तालुकानिहाय मतदानावर दृष्टिक्षेप टाकल्यास सर्वात जास्त मतदान साकोली तालुक्यात झाले. तुमसर तालुक्यात ८१.८२, मोहोडी तालुक्यात ८८.९१, भंडारा तालुक्यात ८१.२६, पवनी तालुक्यात ७८.६४, साकोली तालुक्यात ८६.११, लाखनी तालुक्यात ८४.२९तर लाखांदूर तालुक्यात ८३.०८ टक्के मतदान झाले आहे. मतमोजणी सुरवात होण्याच्या पहिल्या टप्प्यात टपाल मते मोजली जाणार आहेत.