लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पुढील पाच वर्षात ५०० एकर तुती लागवड करण्याचे नियोजन करण्यात येईल. या लागवडीसाठी लागणारा निधी व मनुष्यबळ देण्यासाठी व उद्योग विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जिल्ह्यातील टसर रेशीम उद्योगाशी निगडीत केंद्रीय रेशीम क्षेत्रिय टसर अनुसंधान केंद्र, बुनियादी बिज प्रगुनन आणि प्रशिक्षण केंद्राचे फार्म, ग्रेनेज व अंडीपूज निमीर्ती केंद्रास भेट देवून कामाची पाहणी केली. त्यांचे सोबत बुनियादी बिज प्रगुनन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ के.बी. चव्हाण, क्षेत्रिय टसर अनुसंधान केंद्राचे शास्त्रज्ञ तुषार खरे, रेशीम विकास अधिकारी चंद्रकांत बडगुजर, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी खिलारी होते.जिल्हाधिकारी यांनी केंद्रीय रेशीम मंडळामार्फत फार्मवर चालू असलेले टसर रेशीम संगोपनाची पाहणी केली. त्याचप्रमाणे अंडीपूंज निर्मिती केंद्रावर जावून टसर रेशीमची अंडीपूंज निर्मिती प्रक्रिया पूर्णपणे समजावून घेवून त्याबाबत अधिकाºयांना मार्गदर्शन केले.पवनी येथील पवन विणकरसहकारी सोसायटीला भेट देवून टसर धागा निर्मिती केंद्रातील कामाची पाहणी केली. संस्था चालक व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. कामाबाबत समाधान व्यक्त करुन या कामास सहकार्य करण्यात येईल असे ते म्हणाले.पवनी तालुक्यातील भेंडाळा या गावात सन २०१७-१८ मध्ये मनरेगा अंतर्गत तुती लागवड करण्यात आलेल्या शेतकºयांच्या तुती लागवड प्लॉटची पाहणी केली. यावेळी नवीन तुती लागवड केलेले तालुक्यातील २० प्रगतशील लाभार्थी यांची प्रामुख्याने उपस्थिती होते.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लाभार्थ्यांशी भाजीपाला लागवड, हळद लागवड व विक्री व्यवस्था याबाबत सविस्तर चर्चा करुन याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व आत्माचे प्रकल्प संचालक यांच्या कार्यालयाच्या अधिकाºयांची मदत घेवून योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.आसगाव येथे चालू असलेल्या तुती रेशीम किटक संगोपनाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पी.जी. शिरसाठ, पवनीचे तहसीलदार कुकडे, ग्रो फार्मस प्रोडयुसर कंपनीचे अनिल मेंढे, रेशीम उद्योजक शेतकरी व कार्यालयीन कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तुती लागवडीसाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:17 AM
पुढील पाच वर्षात ५०० एकर तुती लागवड करण्याचे नियोजन करण्यात येईल. या लागवडीसाठी लागणारा निधी व मनुष्यबळ देण्यासाठी व उद्योग विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.
ठळक मुद्दे सुहास दिवसे : जिल्ह्यातील टसर व तुती रेशीम उद्योगाची पाहणी