लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुग्ध उद्योगात मोठ्या आर्थिक हानीचे कारण गुरांमधील वंधत्व आहे. वांझ प्राण्यांना पोसणे एक आर्थिक ओझे असते. या गुरांच्या वंधत्व निवारणासाठी पशुसंवर्धन विभाग, राजस्थान जयपूर येथील शिवम ड्रग्स यांनी कंबर कसली आहे. भंडारा जिल्ह्यातील पाच गावातील वंधत्व असलेली २५० गुरे दत्तक घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे.या पाच गावांमध्ये भंडारा तालुक्यातील दाभा, पांढराबोडी, पवनी तालुक्यातील इटगाव, आसगाव व तुमसर तालुक्यातील बपेरा गावाचा समावेश आहे. सदर मोहीम ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून गुरांच्या तपासणीचे कार्य सुरु झाले आहे. यासाठी चमू गठीत करण्यात आली आहे.या चमूत राजस्थान राज्यातील उदयपूर येथील संयुक्त आयुक्त डॉ.बी. भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली उदयपूर येथील वरिष्ठ पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय माने, चंद्रशेखर गुजर, नरेश गुप्ता यांचा समावेश आहे. चमूच्या सहकार्यासाठी भंडारा पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.सतीश राजू यांच्यासह डॉ.ए.डी. जुमळे, डॉ.बी.के. बारापात्रे, डॉ.येमपुरे, डॉ.एम.के. बारापात्रे आदी अधिकारी, कर्मचारी सहकार्य करीत आहेत.दत्तक घेतलेल्या पाच गावांचा दौरा डॉ.बी. भारद्वाज यांनी केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वंधत्व निवारणासंदर्भात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारतातील ७० टक्के नागरिक पशूपालनावर उदरनिर्वाह करीत आहेत. देशामध्ये दुग्ध उत्पादनातून गोपालकांचे जीवनमान उंचावण्यात मोलाचा वाटा आहे. गायी आणि म्हशीचे लैंगिक चक्र १८ ते २१ दिवसातून एकदा १८ ते २४ तासांसाठी असते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहते. शेतकऱ्यांनी प्राण्यांचे पहाटेपासून रात्रीपर्यंत चार पाचदा जवळून निरीक्षण करावे. कमी उष्णता गेल्यामुळे वंधत्वाची पातळी वाढू शकते. चक्रामध्ये असणाºया प्राण्यांमध्ये दृष्य, चिन्हे ओळखण्यासाठी बऱ्यापैकी कौशल्याची गरज असते. जे शेतकरी उत्तम नोंदी ठेवतात आणि प्राण्यांचे निरीक्षण करण्यात अधिक वेळ घालवतात त्यांना चांगले परिणाम प्राप्त होतात. वंधत्वाची अनेक कारणे असू शकतात. वंधत्व किंवा गर्भार राहण्यास आणि पाडसाला जन्म देण्यास असमर्थता यामागे कुपोषण, जंतू संसर्ग, व्यवस्थापकीय चुका आणि मादीमधील अंडाशय किंवा संप्रेरकामध्ये असमतोलची कारणे असू शकतात.आर्थिक उन्नतीसाठी दुग्धोत्पादन गरजेचेभारतात ३० कोटी गावातील पशू १३ ते १४ कोटी बछडे पैदास करू शकतात. भारतात मोकाट जनावरांची संख्या अधिक आहे. ही जनावरे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. मोकाट जनावरांची देखभाल करून त्यांचे वंधत्व निवारण केल्यास दुग्धोत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. जनावरांची योग्य निगा व काळजी घेतल्यास शेतकºयांचे जीवनमान उंचावू शकते. दत्तक घेतलेल्या पाच गावांतील जनावरांचे एकाच वेळी सर्व्हे करण्यात येणार आहे. वंधत्व असलेल्या जनावरांची तपासणी करून त्यांना गाभण राहण्यासाठी असलेल्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी शेतकऱ्यासह पशूसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचाºयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या उपक्रमाला योग्य पद्धतीने प्रतिसाद मिळाला तर सदर उपक्रम जिल्हाभर राबविण्याचा पशुसंवर्धन विभागाचा मानस आहे.
वंधत्व निवारणासाठी पाच गावे दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 5:00 AM
गावांमध्ये भंडारा तालुक्यातील दाभा, पांढराबोडी, पवनी तालुक्यातील इटगाव, आसगाव व तुमसर तालुक्यातील बपेरा गावाचा समावेश आहे. सदर मोहीम ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून गुरांच्या तपासणीचे कार्य सुरु झाले आहे. यासाठी चमू गठीत करण्यात आली आहे. या चमूत राजस्थान राज्यातील उदयपूर येथील संयुक्त आयुक्त डॉ.बी. भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली उदयपूर येथील वरिष्ठ पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय माने, चंद्रशेखर गुजर, नरेश गुप्ता यांचा समावेश आहे
ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाचा पुढाकार : तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन