लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी जिल्हा प्रशासन व नगर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष संगोपन व संवर्धन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागानेच वृक्ष लागवड व संवर्धन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी वृक्ष दत्तक दिले.यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपवन संरक्षक विवेक होशिंग, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, उपनगराध्यक्ष आशु गोंडाणे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, वित्त व लेखा अधिकारी अशोक मातकर, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, प्राचार्या आरती गुप्ता व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्ष दत्तक देवून या उपक्रमाची सुरुवात केली. झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड व एक ट्रि गार्ड दत्तक देण्यात आले. या ट्रि गार्डवर विद्याथ्यार्चे नाव असणार आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केले.या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी त्या-त्या विद्यार्थ्यांवर असणार आहे. वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा प्राचार्य नियमित घेणार आहेत. वृक्षाची निगा व संवर्धन करण्याऱ्या विद्यार्थ्यांस पुढील वर्षी पारितोषिक देण्यात येणार आहे. मानवाला जीवंत राहण्यासाठी प्राणवायुची गरज आहे. प्राण वायु देण्याचे काम वृक्ष करतात. वसुंधरेने तयार केलेल्या संसाधनाचा मानव वापर करीत असला तरी प्राणवायु निर्माण करण्यासाठी लागणारे वृक्ष लावण्याचे काम मात्र होत नाही. वृक्ष दत्तक मोहिमेत वृक्ष लावा व वसुंधरेला जगवा असे संस्कार विद्यार्थ्यांवर करण्याचा उद्देश आहे. या मोहिमेत महात्मा गांधी विद्यालयातील ८५ विद्यार्थी व शिक्षकांनी स्वयंस्फूर्तेने सहभाग घेतला.निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात वृक्ष लावण्यासाठी खड्डे खोदणे, वृक्ष व इतर साहित्य जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन दिले. नगर पालिकेच्या वतीने ट्रि गार्ड पुरविण्यात आले.विद्यार्थी संस्कारक्षम असतात त्यांच्यावर वृक्ष संवर्धनाचे संस्कार बालवयात केल्यास भविष्यात ते पर्यावरणाचे दूत म्हणून काम करतील या उद्देशाने विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आजच जर आपण पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर आॅक्सीजनचा सिलेंडर सोबत घेवून फिरण्याची मानवावर वेळ येईल. हा धोका टाळण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लावावे म्हणून प्रशासनाने पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक दिले आहे. ही झाडे आधूनिक पध्दतीने लावण्यात येणार आहे. या झाडाला पाणी देण्यासाठी प्लास्टिक बॉटलचा वापर करण्यात येणार आहे. या बॉटल झाडासोबत विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. कमीत कमी पाण्यात वृक्ष संगोपन व संवर्धन हा या मागचा उद्देश आहे. वृक्ष संगोपन करण्याºया विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षिसही देण्यात येणार आहे. हा उपक्रम टप्प्याटप्प्याने अन्य शाळांमध्ये राबविण्याचा मानस आहे.- विजय भाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी
संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घेतले वृक्ष दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 9:38 PM
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी जिल्हा प्रशासन व नगर परिषद गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यार्थ्यांना वृक्ष दत्तक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. वृक्ष संगोपन व संवर्धन हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागानेच वृक्ष लागवड व संवर्धन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी वृक्ष दत्तक दिले.
ठळक मुद्दे८५ विद्यार्थ्यांचा सहभाग : प्रशासनाचा अभिनव उपक्रम, नगर परिषद गांधी विद्यालयात वृक्षारोपण