शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

प्रगतीच्या प्रशिक्षणात ‘अ’प्रगत व्यवस्था

By admin | Published: February 15, 2017 12:22 AM

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा प्रगत करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

शिक्षण विभागाचे नियोजन : अखिल सभागृहात बैठक व्यवस्थेअभावी अनेक जण बाहेरभंडारा : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा प्रगत करण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या अनुषंगाने आज गणेशपूर येथील अखिल सभागृहात जलद, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण ठेवण्यात आले. मात्र सभागृहात बैठक व्यवस्था अपुरी असतानाही त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने टाकलेले प्रगतीचे पहिले पाऊलच अप्रगत ठरल्याचे दिसून आले. जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी प्राथमिक म्हणून रविकांत देशपांडे यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी आल्याआल्याच कामामध्ये दिरंगाईपणा करणाऱ्यांची ‘कासरे’ आवरली आहेत. जिल्हा परिषदच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह खासगी शाळा प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. या अनुषंगाने आज गणेशपूर येथील अखिल सभागृहात जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी, प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक तथा ग्रामसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षणासाठी बोलाविण्यात आले होते. अखिल सभागृहाची बैठक व्यवस्था ७०० ते ९०० च्या घरात असताना शिक्षण विभागाने याची शहानिशा न करता जिल्ह्यातील सुमारे हजारावर शिक्षक व ग्रामसेवकांना येथे बोेलविले. ग्रामसेवक तथा शिक्षक सकाळी ११ वाजता सभागृहात उपस्थित झालेत. मात्र नियोजनाअभावी बैठक व्यवस्था अपुरी असल्याने अनेक ग्रामसेवक तथा शिक्षकांना बसायला जागा मिळाली नाही. सुमारे दोन तास ग्रामसेवक व मुख्याध्यापक सभागृहाबाहेर उभे होते. अनेकांनी या प्रशिक्षणाला पाठ दाखवून बाहेरूनच परस्पर निघून गेल्याचे चित्र बघायला मिळाले. (शहर प्रतिनिधी)ग्रामसेवक परतलेग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून लाखोंचा निधी प्राप्त झाला. १५ टक्के निधी शिक्षणावर खर्च करावयाचा आहे. शिक्षक व ग्रामसेवकांमध्ये समन्वय साधता यावे यासाठी ग्रामसेवकांना बोलाविण्यात आले. मात्र बैठक व्यवस्था नसल्याने ग्रामसेवकही आल्यापावली परतले. प्रशिक्षणात याचा आहे समावेशया एकदिवसीय प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांना शाळासिद्धी, डिजीटल शाळा, ई-लर्निंग व जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यांची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात येणार होती. मात्र ११ वाजतानंतरही काही तज्ज्ञ सभागृहात उपस्थित न झाल्याने आलेल्यांना ताटकळत राहावे लागल्याने शिक्षण विभागाप्रती त्यांच्यात असंतोष दिसून आला.यालाच ‘प्रगत’ प्रशिक्षण म्हणायचे काय? जलद व प्रगत शैक्षणिक प्रशिक्षणाच्या नावावर शिक्षण विभागाने जिल्हाभरातील मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व ग्रामसेवकांना एकाच वेळी सभागृहात बोलाविले. जागेअभावी अनेकजण सभागृहाबाहेर उभे होते. यावेळी सभागृहात तज्ज्ञ तथा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून उपस्थित प्रगतीचे धडे दिल्या जात होते. यावरूनच सभागृहात एक तर सभागृहाबाहेर दुसरीच परिस्थिती दिसून येत असल्याने प्रगत प्रशिक्षण म्हणावे काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.