लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रतिकूल परिस्थिती प्रयत्न करणाºयांना यशाचा मार्ग दाखविते. ती उत्तम विद्यापीठ ठरते. या विद्यापीठात रडगाणे गाणारे मागे पडतात, असा शिबिरार्थ्यांशी संवाद साधत, कोका जंगल येथे युवक युुवतींच्या ‘गांधी जीवन व विचार या त्रिदिवसीय निवासी शिबिरात शिबिराचे उद्घाटक, भंडारा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी यशाचा मूलमंत्र दिला.ते म्हणाले, दुसºयांचे भले करण्यात स्वत:चे भले होते. त्यांनी विधिसेवा व कायदेविषयक प्रबोधन करतांना, महिलांबद्दल बोलके करीत, निर्भय बनण्याचा सल्ला मुलींना दिला. थेट संवाद साधत श्रोत्यांना बोलके करणे हा प्रबोधनाचा योग्य मार्ग याची प्रचिती, सामाजिक बांधिलकेचे व्रत घेतलेले सेवानिवृत्त अभियंता प्रकाशचंद्र अग्रवाल यांनी या शिबिरात आणून दिली. ‘विश्वास’ मतलब गांधी या विषयावर बोलतांना ते म्हणाले, गांधींच्या मागे सारा भारत उभा राहिला तो त्यांच्यावरील विश्वासाने, हा विश्वास गांधीजींना आपल्या कार्याने निर्माण करावा लागला. त्यामुळे गांधी म्हणजे विश्वास हे समीकरण तयार झाले. गांधीजींनी आत्मविश्वास, सत्य अहिंसा ही मुल्ये या भरवशावर असाध्य ते सध्या करून दाखविले. जगापुढे एक आदर्श प्रस्थापित केला. या सत्रात प्रत्येक शिबिरार्थ्याने निर्भयपणे बोलण्यात यश मिळविले.कार्यक्रमाला प्रारंभ ‘गांधी कधी न सरणार’ या कवियत्री स्मिता गालफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या समूहगीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेवी उद्योजक तसेच शिबीर सहप्रमुख रामविलास सारडा होते. आभार शिबिर सहप्रमुख महेश रणदिवे यांनी मानले.शिबिराच्या प्रथम सत्रात शिबीर प्रमुख प्रा. वामन तुरिले यांनी शिबिराची पूर्व तयारी या स्वरूपात ‘मोहन ते महात्मा आणि महानायक’ या विषयावर माहिती दिली.हर्षल मेश्राम, विद्यार्थी मोहनदास, शिबीर सहप्रमुख महादेवराव साटोने ‘वैज्ञानिक दृष्टिकोण आणि गांधींजी’ शिबिर स्मिता गालफाडे ‘अहिंसा’ , सुनीता जांगळे ‘१९१७ च्या चंपारण्य सत्याग्रहात गांधीजींचे तंत्र व शोषणमुक्तीचा लढा, भंडारा जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता अरविंद डाखरे ‘पाणी’ या विषयावर मार्गदर्शन केले.प्राकृतिक चिकित्सेवर मान्यवरांचे मार्गदर्शनप्राकृतिक चिकित्सा दिवसाचे औचित्य साधत प्राकृतिक चिकित्सक, योग्य शिक्षक तसेच किसान पंचायत प्रभारी डॉ.रमेश खोब्रागडे यांनी प्राकृतिक चिकित्सेची मूलभूत तत्त्वे सांगितली. तर ज्ञानेश्वर बोडखे यांनी प्रात्यक्षिकांसहित योग्य आणि आरोग्याची गुरुकिल्ली हा विषय मांडला. यांनतर सेंद्रीय शेतीचे पुरस्कर्ते , गोरठाण नाशिक येथील अण्णाजी हांडे यांनी ‘यशश्वी शेती व गांधी विचार’ यांचा समन्वय आपल्या परिणाम कारखा व परखड भाषेतील भाषणातून साधला. शिबिरार्थ्यांच्या पडलेल्या गटांनी स्वदेशी, श्रम, प्रतिष्ठा, यंत्र शरणता, पुतळ्यात बंदिस्त गांधी आणि आत्मभान या विषयांवर गट चर्चा करून अहवाल सादर केले. यावेळी शेकडो शिबिरार्थी उपस्थित होते
प्रतिकूल परिस्थिती प्रयत्न करणाऱ्यांना यशाचा मार्ग दाखविते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:51 PM
प्रतिकूल परिस्थिती प्रयत्न करणाºयांना यशाचा मार्ग दाखविते. ती उत्तम विद्यापीठ ठरते. या विद्यापीठात रडगाणे गाणारे मागे पडतात, असा शिबिरार्थ्यांशी संवाद साधत, कोका जंगल येथे युवक युुवतींच्या ‘गांधी जीवन व विचार या त्रिदिवसीय निवासी शिबिरात शिबिराचे उद्घाटक, भंडारा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी यशाचा मूलमंत्र दिला.
ठळक मुद्देसंजय देशमुख : कोका येथे निवासी शिबिरानिमित्त विविध कार्यक्रम, शेकडो शिबिरार्थ्यांनी घेतला लाभ