माहितीनुसार, पोलीस स्टेशन अडयाळला तिन्ही अल्पवयीन मुली गायब असल्याची तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे, पोलीस हवालदार हेमराज सोरते, सुभाष रहांगडाले, साहाय्यक फौजदार गंगाधर आडे, पोलीस अंमलदार हितेश हलमारे, राजेश मस्के यांनी मुलींना शोधून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्या तिन्ही मुलींना वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शोधण्यात आले. त्यात एकीला अडयाळजवळील चिचाळ तर दुसरीला चंद्रपूर तर तिसरीला छत्तीसगडमधील दुर्ग महिला पोलीस ठाणे येथून आणण्यात आले. पोलीस स्टेशन अडयाळ येथे विशेषतः फरार झाल्याच्या तक्रारींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे अल्पवयीन मुली जेव्हा गायब झाल्याची तक्रार जेव्हा एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होते, अधिकारी व कर्मचारी वर्गसुद्धा आपले सर्व काम बाजूला सारून याच कामात अधिक प्रमाणात व्यस्त असल्याचे आढळून येते. एका आठवडाभरात तिन्ही अल्पवयीन मुलींना शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याने अडयाळ ग्रामवासी यांनी अडयाळ पोलिसांचे आभार मानले आहेत.
‘त्या’ तिन्ही अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यास अडयाळ पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:06 AM