लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ तालुक्याच्या मागणीसाठी संतप्त असलेल्या परिसरातील नागरिकांनी खासदार मधुकर कुकडे यांना घेराव घालून संताप व्यक्त केला.पंचायत समिती पवनी जिल्हा परिषद भंडारा तर्फे गुरुवारला अड्याळ येथील बाजार ग्राऊंड येथे तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनी तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा विरोध नसला तरी या कार्यक्रमात येणारे जिल्ह्याचे आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींचा तथा नेते मंडळींना गावबंदी असल्याची बातमी एक दिवसा आधीच प्र्रकाशित झाल्याने नेते मंडळींना ही बातमी विचार करण्यासारखेच होते. तालुकास्तरीय कृषी प्रदर्शनी तथा शेतकरी मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सहउद्घाटक आलेच नाही. पंरतु कार्यक्रमाचे उद्घाटक मधुकर कुकडे खासदार भंडारा, गोंदिया हे मात्र उशिरा का होईना ते कार्यक्रमाला आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला अड्याळ ग्रामस्थांनी कुठलाही विरोध दर्शवला नव्हता. कारण मंचकावर त्यावेळी मधुकर कुकडे, डॉ. परिणय फुके, अॅड. रामचंद्र अवसरे हे जिल्ह्याचे नेतृत्व करणारी मोठी नेते मंडळी नव्हती. कार्यक्रमाच्या शेवटी मधुकर कुकडे आल्याची जशी माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी पशुवैद्यकिय दवाखाना येथे खासदार मधुकर कुकडे यांना घेराव घातला व निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर अड्याळ पोलीस ठाणे येथे चर्चा बैठक मधुकर कुकडे यांनी घेतली. त्यात शंभर टक्के अड्याळला तालुका करणार म्हणून तोंडी आश्वासन दिले. यावेळी शेकडो अड्याळ ग्रामवासी निवेदन देतांना व चर्चा बैठकीत उपस्थित होते.
अड्याळ ग्रामस्थांचा खासदारांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 9:46 PM
अड्याळ तालुक्याच्या मागणीसाठी संतप्त असलेल्या परिसरातील नागरिकांनी खासदार मधुकर कुकडे यांना घेराव घालून संताप व्यक्त केला.
ठळक मुद्देतालुका निर्मितीची मागणी : अड्याळ तालुका हमखास करण्याचे आश्वासन