शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

लाक्षणिक संपाने वीज केंद्रांचे कामकाज प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 9:39 PM

आपल्या विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी- अभियंत्यांनी सोमवारी पुकारलेल्या लाक्षणिक संपाने जिल्ह्यातील वीज केंद्राचे काम प्रभावित झाले. अधिकाºयांना रात्री १२ वाजतापासून कंट्रोलरुमचा ताबा घ्यावा लागल्याने त्यांची झोप उडाली. जिल्ह्यातील ९० टक्के अभियंते, कर्मचारी यात सहभागी झाले. मात्र या लाक्षणिक संपाचा सर्वसामान्य नागरिकांना कोणताही फटका बसला नाही.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची झोप उडाली : संपाचा नागरिकांना मात्र फटका नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्या विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी- अभियंत्यांनी सोमवारी पुकारलेल्या लाक्षणिक संपाने जिल्ह्यातील वीज केंद्राचे काम प्रभावित झाले. अधिकाऱ्यांना रात्री १२ वाजतापासून कंट्रोलरुमचा ताबा घ्यावा लागल्याने त्यांची झोप उडाली. जिल्ह्यातील ९० टक्के अभियंते, कर्मचारी यात सहभागी झाले. मात्र या लाक्षणिक संपाचा सर्वसामान्य नागरिकांना कोणताही फटका बसला नाही.उर्जा उद्योगाच्या कर्मचारीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ राज्य भरातील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी सोमवारी १ दिवसाचा लाक्षणीक संप पुकारला होता. याला भंडारातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाच्या अधिकारातील चारही वीज कंपन्यातील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात व उर्जा उद्योगाच्या धोरणासंदर्भात कामगार संघटनेने विद्युत व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. वेळोवेळी विविध पातळीवर बैठका झाल्या. मात्र मंत्री व व्यवस्थापन पातळीवर यांच्यामध्ये होणाºया चर्चेत वाटाघाटी झाल्या होत्या. मात्र त्या चर्चेची कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. यात राज्य पातळीवरील वीज कर्मचारी व अभियंते संघटना संयुक्त कृती समितीची बैठक १३ डिसेंबरला पार पडली होती.यात शासन आणि व्यवस्थापनाच्या संघटनेने मांडलेल्या धोरणात्मक बाबी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर उर्जा विभागाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच मागण्यांची पूर्तता पूर्ण करण्याकरिता व शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता ७ जानेवारीला २४ तासांचा राज्यव्यापी लाक्षणीक संप करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. त्याअंतर्गत भंडारा येथे मुख्य कार्यालयासमोर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहून संपात सहभाग नोंदविला. तसेच मागण्यांचे निवेदन चारही कंपन्यांच्या अध्यक्षांच्या नावे पाठविले.कर्मचारी व अभियंत्यांच्या प्रमुख मागण्याअंतर्गत, महापारेशन कंपनीतील स्टॉफ सेटअप लागू करीत असताना मंजुर पदे कमी करू नये, महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनेने सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणावीत, शासन व व्यवस्थापनाने महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येत असलेले खाजगीकरणाचे धोरण थांबवावे, महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या लघुजल विद्युत निर्मित संचाचे शासनाने अधिग्रहण करू नये तसेच महानिर्मिती कंपनीच्या २१० मेगॉव्हॅट संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे आदी मागण्यांचा समावेश आहे.या लाक्षणीक संपात वर्कर्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर भट, हरिश डायरे, सुशिल शिंदे, अखिल कुरैशी, वैशाली निपाने, सुनिता कुंजेकर, कळंबे, प्रिया तामगाडगे, भोंगाडे, पराग फटे, विलास गायधने यांच्या नेतृत्वात लाक्षणीक संप करण्यात आला.