शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

अखेर आश्वासनानंतर लाखांदुरात महिलांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 9:53 PM

गाव नमूना आठ नुसार आखिव पत्रिका मिळण्यात यावे याकरिता लाखांदूर येथील महिलांनी २३ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत आमदार परिणय फुके बाळा काशिवार उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या सोडविणार नाहीत तो पर्यत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्या महिलांनी केला होता. आंदोलनकर्त्यांचा मान ठेवून दोन्ही आमदारांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : गाव नमूना आठ नुसार आखिव पत्रिका मिळण्यात यावे याकरिता लाखांदूर येथील महिलांनी २३ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत आमदार परिणय फुके बाळा काशिवार उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या सोडविणार नाहीत तो पर्यत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्या महिलांनी केला होता. आंदोलनकर्त्यांचा मान ठेवून दोन्ही आमदारांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी आमदार परिणय फुके यांनी तहसीलदार महल्ले यांच्यासोबत चर्चा करून गाव नमूना आठ नुसार आखिव पत्रिका तयार करण्याबाबत चर्चा केली. त्यांनतर उपोषणकर्त्यांच्या समस्या ऐकल्या. वर्षभरामध्ये प्रक्रीया पूर्ण करुन आखिव पत्रिका देण्याचे लेखी आश्वासन महिलांना दिले.यावेळी उपोषणावर बसलेल्या रत्नमाला धनराज गजभिये व इतर उपोषणकर्त्या महिलांना लिंबू पाणी पाजून व पुष्पहार घालून उपोषणाची सांगता करण्यात आली.उपोषणास्थळी आमदार परिणय फुके व आमदार बाळा काशिवार बैलबंडीने यावे, असा आग्रह महिलांनी धरला होता. महिलांच्या आग्रहास्तव आमदार फुके यांनी बैलबंडीवर बसून उपोषणस्थळी पोहोचले. यावेळी दोन्ही आमदार यांच्यासोबत महामंत्री नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, नुतन कांबळे, हरीश बघमारे, दिलीप चित्रिव, तहसिलदार महल्ले, पोलिस निरीक्षक मेश्राम, मुख्य अधिकारी परिहार, नगर पंचायत चे सर्व नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.वर्षभरामध्ये आखिव पत्रिका देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्या महिलांनी दोन्ही आमदारांचे आभार मानले.