लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : अपघातानंतर दिव्यांग झालेल्या आयटीआय विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक परीक्षेपासून वंचित ठेवण्याची घटना शासकीय आयटीआय परीक्षा केंद्रावर घडली. युवा काँग्रेस नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी आयटीआय परीक्षा केंद्रावर धाव घेवून प्राचार्याशी चर्चा केली. अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अन्यायग्रस्त विद्यार्थ्याला परीक्षेला परवानगी देण्यात आली.दिव्यांग चंद्रशेखर बरयेकर स्व. सेवकराम पारधी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरदोलीचा विद्यार्थी आहे. जोडारी ट्रेडच्या परीक्षेनंतर एका कारखान्यात त्याचा अपघात झाला. अपघातात त्याचा डावा हात निकामी झाला. दरम्यान त्याची प्रात्याक्षिक परीक्षा तुमसर येथील शासकीय आयटीआयमध्ये होती, परंतु प्रात्यक्षीक परीक्षेपासून त्याला वंचित ठेवण्यात आले. दिव्यांग चंद्रशेखने डॉ. पंकज कारेमोरे, कमलाकर निखाडे यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. डॉ. कारेमोरे यांनी प्राचार्य आर.एस. राऊत यांचेशी चर्चा केली. प्राचार्य राऊत यांनी नागपूर येथील सहउपसंचालक यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली. परंतु नियमांचा दाखला येथे देण्यात आला. एक विशेष बाब म्हणून चंद्रशेखर याला प्रात्याक्षिक परीक्षेपासून वंचित ठेवले तर अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा अधिकाºयांना दिला होता.दिव्यांग चंद्रशेखर बरयेकर याने जोडारी विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा दिली. त्याचा आम्ही विचार करून नियमानुसार मदत केली.-आर.एस. राऊत, प्राचार्य शासकीय आयटीआय तुमसर.प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी दिव्यांग झाला असेल तर तो परीक्षेपासून वंचित कसा राहू शकतो. नियमात तसी तरतूद करावी. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, असा आमचा प्रश्न होता. प्रश्न निकाली काढला. त्याबाबत प्राचार्यांचे धन्यवाद देतो.-डॉ. पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते तुमसर.
अखेर 'त्या' दिव्यांग विद्यार्थ्याने दिली प्रात्यक्षिक परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 10:11 PM
अपघातानंतर दिव्यांग झालेल्या आयटीआय विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक परीक्षेपासून वंचित ठेवण्याची घटना शासकीय आयटीआय परीक्षा केंद्रावर घडली. युवा काँग्रेस नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी आयटीआय परीक्षा केंद्रावर धाव घेवून प्राचार्याशी चर्चा केली. अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अन्यायग्रस्त विद्यार्थ्याला परीक्षेला परवानगी देण्यात आली.
ठळक मुद्देकारेमोरे यांचा पुढाकार : शासकीय आयटीआयमधील प्रकार