अनुकंपाधारक उमेदवार जिल्हा परिषदेसमोर ३० एप्रिलपासून उपोषणाला बसले होते. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे उमेदवारांना अद्यापही नियुक्तीपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली. राज्यात इतर जिल्हा परिषद प्रशासनाने अनुकंपाधारक उमेदवारांची भरतीप्रक्रिया केली आहे. मात्र, भंडारा जिल्हा परिषद यास अपवाद ठरत आहे. शासनाच्या ५ फेब्रुवारी २०२० आणि ३० जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार लवकरात लवकर भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी यशवंत सोनकुसरे, पवन मस्के यांनी अनुकंपाधारक उमेदवारांना पाठिंबा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन पानझाडे यांनी सविस्तर चर्चा करून उमेदवारांना भरतीप्रक्रिया राबवणार असल्याची ग्वाही दिली. तसेच ८ एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी चर्चा करून न्यायाची मागणी केली. त्यानंतरच अनुकंपाधारक उमेदवारांनी हे उपोषण स्थगित करत असल्याचे अश्विनी जांभूळकर व अन्य उमेदवारांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अनुकंपाधारकांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:33 AM