लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : निवेदन द्या, तोंडी विनवणी करा प्रशासनाला जराही फरक पडत नाही. असं चालायचंच म्हणून गंभीरतेनं कोणतेच अधिकारी घेत नसल्याच प्रत्यय अनेकदा येतय. प्रशासनाला धावपळीला लावण्यासाठी आंदोलनाचा हत्यार उपसलं की सगळे वळणावर येतात अन् कामही होते असा प्रकार पांढराबोडी येथील शिक्षक मागणीच्या निमित्ताने बघायला लागला.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पांढराबोडी येथे शिक्षक मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळा बंद आंदोलन करण्यात आले. शाळा बंद झाल्याने प्रशासनात धावपळ सुरु झाली. अखेर शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांच्या पुढाकाराने आंदोलन सोडविण्यात आले. लवकरच त्या शाळेला मानधन तत्वावर स्वयंसेवक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद भंडाराचे शिक्षण सभापती धनेंद्र तुकर यांनी दिले. जिल्हा परिषद पांढराबोडीच्या शाळेत इयत्ता ७ अन् शिक्षक चार अशी अवस्था होती. किमान अधिक एक तरी शिक्षक देण्यात यावा यासाठी शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थापन समितीकडून निवेदन देण्यात आले होते. ९ जुलै पर्यंत शिक्षक विभागाने मागणीची पूर्तता करावी असा इशारा समितीकडून देण्यात आला होता. अन्यथा पुढच्या दिनांकापासून शाळा बंद आंदोलन होईल असेही कळविले होते. पण नित्याप्रमाणे शिक्षण विभागाने त्यांच्या निवेदनाकडे लक्षच दिले नाही. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत एकही मुलगा बसू दिला नाही. तीन दिवसानंतर शिक्षण विभागाला जाग आली. १३ जुलै ला जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी पांढराबोडी शाळेला भेट दिली. गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गभणे, वरिष्ठ शि.वि. अधिकारी विभावरी पडोळे हे अधिकारी आले. सोबत जि.प. सदस्या राणी ढेंगे, पं.स. सभापती विशाखा बांडेबुचे, पं..स. सदस्य निता झंझाड, हरदोलीचे सरपंच सदाशिव ढेंगे असा पदाधिकाऱ्यांचा ताफा जिल्हा परिषद शाळेत जमा झाला. यावेळी आंदोलनकर्ते व गावकरी संतप्त झाले होते. जि.प. चे शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर व सरपंच सदाशिव ढेंगे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शिक्षण मागणीवर शिक्षण सभापती यांनी तोडगा काढला. लवकरच गावातील शिक्षित मुलाला मानधन तत्वावर शिक्षक नेमण्यासाठी शिक्षण विभागातर्फे पत्र दिले जाईल या अटीवर आंदोलन मागे घेण्यात आले.शिक्षक मिळणार ही आनंदाची बातमी सांगायला व मुले शाळेत आणायला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उदेभान भोयर, उपाध्यक्ष सहादेव वैद्य घरोघरी फिरले. काही वेळात लहान बालके दप्तर घेऊन शाळेत आली. तीन दिवस बंद असलेली शाळा पुन्हा मुलांच्या किलबिलाने गजबजून गेली. यावेळी नवीन शिक्षक मिळणार ही आशा पल्लवीत झालेल्या विद्यार्थिनी शिक्षण सभापती, सदाशिव ढेंगे, अधिकारी व पदाधिकाºयांना कुंकूम तिलक लावले. त्यांच्या पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. अधिकाºयांच्या डोक्यावर आलेला ताण कमी झाला.
आश्वासनानंतर गजबजली ‘ती’ शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:16 PM
निवेदन द्या, तोंडी विनवणी करा प्रशासनाला जराही फरक पडत नाही. असं चालायचंच म्हणून गंभीरतेनं कोणतेच अधिकारी घेत नसल्याच प्रत्यय अनेकदा येतय. प्रशासनाला धावपळीला लावण्यासाठी आंदोलनाचा हत्यार उपसलं की सगळे वळणावर येतात अन् कामही होते असा प्रकार पांढराबोडी येथील शिक्षक मागणीच्या निमित्ताने बघायला लागला.
ठळक मुद्देशिक्षण सभापतीची शिष्टाई : स्वयंसेवक मिळणार, मागणी मान्य