अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : ऐतिहासिक पवनी नगरात कित्येक मंदिर आहेत. त्यामुळे नगराला टेम्पल सिटी असेही संबोधले जाते. पर्यटकांना आकर्षित करणारे कित्येक स्थळ आहेत. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी त्यांचेवर मरगळ आलेली आहे. बारा वर्षापुर्वी तयार करण्यात आलेला गौतम वॉर्डातील बालोद्यान आतापर्यंत उपेक्षित होता. मात्र पालिकेतील सत्ताबदलाच्या बारा वर्षानंतर बालोद्यानाला अच्छे दिन आलेले आहेत. त्यांचा पुर्णत: कायापालट होत आहे.सावत्रिक निवडणुकीने अध्यक्ष पदावर दिग्गजांना पराभूत करून निवडून आल्यानंतर गौतम वॉर्डातील रहिवासी असलेल्या डॉ. योगेश रामटेके यांनी गौतम वॉर्डातील सार्वजनिक मोकळ्या जागेचा वापर व्हावा म्हणून बालोद्यान निर्माण केला. वर्ष दोन वर्ष वॉर्डातील बालगोपालांनी मौजमस्ती करून बालोद्यानाचा आनंद लुटला. परंतू देखभाल दुरूस्ती अभावी बालोद्यानाचे जे व्हायचे तेच झाले. बसायचे ओटे, बालकांच्या खेळण्याची साधने, झाडे झुडपे सर्व उध्वस्त झाले. पालिकेने त्याकडे पुर्णत: दुर्लक्ष केले. दहा लाख रूपये खर्च करून पालिकेने मोकळी जागा सुरक्षित केली अशा आशयाच्या बातम्या लोकमतने प्रकाशित केल्या. मधल्या काळात तारेचे कुंपन काढून पक्की आवारभिंत करण्यात आली. त्यावेळी मुकेश बावनकर अध्यक्ष होते.परंतु मधील सर्व व्यवस्था कोलमडली असल्याने बालोद्यान कुलूपबंदच राहिले.पालिकेत अध्यक्ष निवडीचे शासनाचे धोरण बदलले पुन्हा एकदा एका दशकानंतर सार्वत्रिक निवडणुकीने अध्यक्ष निवडण्यात आले. नगर विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष विलास काटेखाये यांनी सर्व शक्ती पणास लावून त्यांच्या पत्नी पूनम काटेखाये यांना अध्यक्षपदी निवडून आणले. पालिकेत सर्वांची एकजूट करून सत्ता स्थापन केली. विकास हा दृष्टीकोन ठेवून गौतम नगर वॉर्डातील बालोद्यानासाठी पन्नास लाखाची तरतूद केली.बालोद्यानाचे अच्छेदिन सुरू झाले. उमरेड-पवनी-कºहांडला अभ्यारण्याचे गेट असलेल्या खापरी नाक्यावरून लक्ष वेधल्या जाईल, अशी व्यवस्था बालोद्यानात करण्याचे काम सुरू आहे.
एका तपानंतर बालोद्यानाला आले ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:26 PM
ऐतिहासिक पवनी नगरात कित्येक मंदिर आहेत. त्यामुळे नगराला टेम्पल सिटी असेही संबोधले जाते. पर्यटकांना आकर्षित करणारे कित्येक स्थळ आहेत. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी त्यांचेवर मरगळ आलेली आहे.
ठळक मुद्देएकमेव बालोद्यानाचा कायापालट : पवनी येथील गौतम वॉर्डातील नागरिकांना मिळाला दिलासा