बॉक्स
कशामुळे होतो
एडीस नावाच्या डासापासून झिका व्हायरस पसरतो. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. दिवसा चावतो. विशेष म्हणजे कमरेच्या खाली हा मच्छर चावण्याचे प्रमाण जास्त आहे.
बॉक्स
झिका व्हायरसची लक्षणे काय
अंग दुखणे, सांधे दुखणे, ताप येणे, डोळे लाल होणे, त्वचेवर पुरळ येणे. या व्हायरसवर कुठलीही लस नाही. कुठलाही उपचार नाही. गर्भवती महिलेला हा डास चावल्यास जन्मास येणाऱ्या शिशुच्या मेंदूचा आकार छोटा होतो. त्यामुळे अधिक खबरदारी बाळगली जात आहे.
बॉक्स
उपाययोजना काय
डासांची उत्पत्ती करणारे केंद्र नष्ट करण्यावर भर दिला जात आहे. शौचालयाचे पाईप जाळीदार पिशवीने बांधून ठेवल्यास डास बाहेर पडणार आहे. याशिवाय गप्पी मासे डबक्याच्या ठिकाणी सोडल्यास डास सारे नष्ट होते.
कोट
झिका व्हायरस रोखण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. याशिवाय गप्पी मासेही सोडले जाणार आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा. राज्य शासनाच्या निर्देशानंतर तातडीने बैठकीतून मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. अदिती त्याडी, जिल्हा हिवताप अधिकारी, भंडारा