शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

पावसाच्या हजेरीनंतरही आठ टक्केच जलसाठा

By admin | Published: July 12, 2016 1:49 AM

गत तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. जिल्ह्यातील लघु, मध्यम व

बेटेकर बोथलीसह १२ प्रकल्प कोरडेच : वैनगंगा नदीपात्रात मुबलक जलसाठा, पावसाचे पाणी जतन करण्याची गरज देवानंद नंदेश्वर ल्ल भंडारागत तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६३ प्रकल्पातील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे़ शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ आठ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जलसाठ्यात किंचीत घट झालेली आहे.लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे़ सध्यस्थितीत बेटेकर बोथली प्रकल्प वगळता चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी ४.९२१, बघेडा १४़७६४, सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा ७.०७९ टक्के आहे़जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ११़७५ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ६.६५ टक्के आहे़ जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी. पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. विदर्भातील महत्वाकांक्षी गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे़ भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ १०़४७५ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ गतवर्षी ११ जुलै २०१५ रोजी ६३ प्रकल्पात १०़४३५ आणि ११ जुलै २०१४ रोजी २३.१९९ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ तीन दिवसांत जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरी आजही जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. १२ प्रकल्पात पाण्याचा ठणठणाटपावसाळा ऋतूला दोन महिने लोटले असले तरी आजही जिल्ह्यातील ११ प्रकल्पांत पाण्याचा ठणठणाट आहे. कोरडे असलेल्या प्रकल्पांमध्ये बेटेकर बोथली, पवनारखारी, हिवरा, डोडमाझरी, मालीपार, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, खंडाळा, चान्ना, डोंगरगाव, एलकाझरी, जांभोरा यांचा समावेश आहे.केवळ ३५८ हेक्टरमध्ये झाली रोवणी४भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात भात लागवडीसाठी १ लाख ८२ हजार ७६२ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारीत करण्यात आले आहे. मात्र मृग, आद्रा नक्षत्रात पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आजपर्यत सिंचनाच्या सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी ३५८ हेक्टर क्षेत्रातील रोवणी आटोपली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार ११ जुलैपर्यत १० हजार ८२६ हेक्टरमध्ये भात नर्सरी (पऱ्हे), ३ हजार ४५४ हेक्टरमध्ये आवत्यांची लागवड करण्यात आली आहे. तुर पिकाचे ४ हजार ३४९ हेक्टर, तीळ ४८ हेक्टर, सोयाबीन २५८ हेक्टर, हळद २०० हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे.