मुखरु बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : दिवाळीपूर्वी शेतात डौलाने उभे असलेले धानपिक हातात येईल व दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसाने घात केला. धान पिकाची पूर्णत: नासाडी झाली असून बांध्यात असलेल्या धानाला आता अंकुर फुटले आहे. पावसामुळे धान काळे पडले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.निसर्ग शेतकºयांच्या पाचवीलाच पूजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दिवाळीच्या प्रकाशमय, उत्साही वातावरणात धानाचा खरीप हंगाम वाया गेल्याने प्रत्येकांनी मन मोठे करून मुलाबाळांना समजावत दिवाळी अंधारातच पार पाडावी लागली. अंकुरलेल्या धानाला (कडपांना) मुल्य नसल्याने संपूर्ण हंगाम वाया गेला. याला पिकविम्याचे कवच मिळेल काय? अशी विचारणा शेतकरी करीत आहे.खरीप हंगामात संपूर्ण खर्च आटोपून हातातोंडाशी आलेले पीक काळेकुट्ट झालेले पाहून शेतकºयांचे काळीज काळे पडले आहे. पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत सर्वे होऊन सुमारे २५०-२८० हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद घेतली आहे. प्रत्यक्षात हजारो हेक्टरचे नुकसान झालेले आहे. दिवाळीच्या दिवसात शेतकरी परिवारासोबत शेतातच कडप्यांना सुकविण्याचा व जमेल तेवढे डोक्यावरून घरी आणीत धान चुरण्याचा प्रयत्न करीत आहे.पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत ४८ गावांचा नुकसान सर्वे सुरु असून पडलेले व कापलेले धानाची नुकसान क्षेत्र सुमारे २५० - २८० हेक्टर बाधीत दिसत आहे. ज्या ज्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे, त्यांनी कृषी कार्यालय बँक, महसूल, विमा कंपनी यांच्याशी तात्काळ संपर्क करून नुकसानीचा क्लेम फार्म भरून घ्यावा. क्लेम फार्म सोबत सातबारा, नुकसानग्रस्त शेताचे फोटो, आधार क्रमांकाच्या छायांकित प्रती जोडाव्या.-अरुण रामटेके, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी कार्यालय, पालांदूरनुकसानग्रस्त शेतकºयांनी पिकविमा उतरविला असल्यास त्यांनी ज्या बँकेतून, संस्थेतून पिककर्ज घेतले त्या बँकेत क्लेमफार्म, नुकसान फार्म, तक्रार फार्म भरून द्यावे. तशा सूचना आम्ही स्थानिक ठिकाणी पुरविल्या आहेत. ज्यांच्या तक्रारी रितसर प्राप्त होतील त्यांची कंपनीच्या वतीने तात्काळ चौकशी केली जाईल. नुकसानीची भरपाई नियमानुसार विचाराधीन राहील.-विनोद इंगळे, प्रबंधक ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, भंडारा.मागील हप्ताभरापासून पावसाच्या हजेरीने माझे दीड एकरातील सुपर फाईन (बारीक व्हेरायटी) धानाच्या कडपांना सडका वास व धान कडपातच अंकुरल्याने सुमारे १.२५ लक्ष रुपयाचे नुकसान झाले आहे. शासनाने पिकविम्याचे कवच देवून शेतकºयांना न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे.-बळीराम बागडे, प्रभावित शेतकरी, पालांदूर (चौ.)
परतीच्या पावसाने बांध्यातच कडपा अंकुरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:41 AM
दिवाळीपूर्वी शेतात डौलाने उभे असलेले धानपिक हातात येईल व दिवाळी धुमधडाक्यात साजरी होईल अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसाने घात केला.
ठळक मुद्देधान पडले काळे : शेतकºयांची दिवाळी अंधारात, बळीराजावर आर्थिक संकट, प्रशासनाचे दुर्लक्ष