मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ) : तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंदच्या तिरावरील पाथरी एक छोटेखानी गाव. घराघरात पशुपालन, कुकुटपालन चालते. पण या सर्वांना पाण्याची टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आता ही समस्या मिटली आहे.गावात यापूर्वी नळयोजना असूनही स्त्रोत अभावाने गावाला पिण्याचे पाणी मिळत नव्हते. नदीकाठावर राहूनही पाण्याकरिता शेताचा, नदीचा आसरा घेत पाण्याची गरज भागविल्या जात असे, राजकारणात खूप मोठी झेप गावकºयांची नसल्याने प्रशासनाचा भरोवश्यावर पाथरीचा विकास अवलंबून होता व आहे. मात्र यातही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी असतातच. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पाथरी गावाला जोडत सदर नळयोजनेचा कार्यालयाला आरंभ झाला.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मोरेश्वर मैदनमवार, उपविभागीय अभियंता विजय देशमुख, भूवैद्यानिक सय्यद, मंगुळकर तसेच विशाल मंत्री यांच्या योग मार्गदर्शनानुसार कामे करीत गावात नळयोजना भरपूर पाण्यासह कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजने संदर्भात गावकºयांनी सहकार्य करीत पाण्याची अडचण दूर केली.पाणी हे जीवन असून अनमोल आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येकांनी काटकसरीने उपयोग करावा. ग्रामपंचायतीने स्वत:च्या निधीतून जलमापन (वाटरमिटर) यंत्र खरेदी करावे. घराघरात नळ घेत नागरिकांनी ग्रामपंचायतीला मदत करावी. जलमापन यंत्राणे पाण्याची गरज व महत्व अबादीत राहते. यामुळे गावात २४ तास पाणी पुरेल याची काळजी आम्ही घेऊ.- सतीश मारबते, शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग भंडारागावात नळयोजना आरंभल्याने गाववाशींयाना अपार आनंद झाला. गावकºयांनीही वैयक्तिक नळकरीता मागणी केली आहे. मागेल त्याला नळ ही योजना कार्यान्वित करीत गावाची तहान भागविण्याचा प्रयत्न करु.- तुळशीदास फुंडे, सरपंच पाथरीअधिकारी वर्गांनी वेळोवेळी आलेल्या अडचणीचा मागोवा घेत सुरळीत नळयोजना कार्यान्वित ठेवावी. जल साक्षरता कार्यक्रमातून आम्हाला मार्गदर्शन करावे.- जितेंद्र कठाणे, उपसरपंच पाथरी
१२ वर्षानंतर पाथरीत नळाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 10:21 PM
मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ) : तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे. लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील चुलबंदच्या तिरावरील पाथरी एक छोटेखानी गाव. घराघरात पशुपालन, कुकुटपालन चालते. पण या सर्वांना पाण्याची टंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आता ही समस्या मिटली ...
ठळक मुद्देवैयक्तिक व सार्वजनिक नळातून पाणी : ऐन उन्हाळ्यात नळाला पाणी