लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे. मग शेतकरी कसा मागे राहणार, तो हीे पुढे सरसावला व अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून शेती करू लागला. त्याचा त्याला फायदाही झाला. परंतु निसर्गाची साथ तसेच शासनाची मदत न मिळाल्याने त्याचा विकास ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.पूर्वी मनुष्यबळाचा, बैलांचा वापर करून शेतातील वखरणी, नांगरणीपासून पेरणीपर्यंत तर पीक काढण्यापर्यंतची कामे होत होती. यात शेतकरी शारीरिकदृष्ट्या दणकट होता. त्यासोबत योग्य प्रमाणात गाय-बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत होते. परंतु तंत्रज्ञानाचा विकास होत गेला व नवनवीन शेतीपुरक साधने तयार होऊ लागली. यात ट्रॅक्टर, हार्वेस्टर मशीन ही तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेची झाली आहेत.शेतकºयांची दुसरी पिढी तंत्रज्ञानाचा उपयोग करीत कमी कष्टाळू झाली. पूर्वी बैलांच्या मदतीने शेताची वखरणी करण्यासाठी सहा - सात दिवस लागायचे. शेताच्या कामावर असणारा मजूर पहाटेच शेतात जाऊन वखर जुंपायचा. माळराणावरून (मचान) शेतकºयाची पत्नी हाक मारीत 'अव धणी चटणी - भाकर खायाला या हो' अशी सकाळी १०- ११ वाजताच्या दरम्यान आवाज शेतारानात घोंगायचा. आणलेली शिदोरी आपल्या बायकोसोबत सकाळची न्याहरी करायचा. यावेळी बैलालाही थोडा वेळ विश्रांती देऊन त्याला चारापाणी दिला जायचा. त्यानंतर पुन्हा कामाला लागायचे. दुपारी सूर्य डोक्यावर आला की वखर मांडवात आणून थोडा वेळ विश्रांती घ्यायचा. सायंकाळी परत ४ वाजतापासून त्याचे वखरणीचे काम सुरु व्हायचे. परंतु ते चित्र आज दिसेनासे झाले आहे. आज सामान्यातला सामान्य शेतकरीदेखील ट्रॅक्टरच्या सहाय्याने वखरणी करण्यास प्राधान्य देत आहे.यापुढे पैशाची तसेच वेळेचीही बचत होत असली तरी बैलजोडीचा अभाव व शेतमजुरांची कमतरता हे सुद्धा कारण यांना कारणीभूत आहे. परिणामी शेतकºयांचे हात बळकट राहले नाही. वखरणी झाल्यानंतर पेरणी, निंदन, खुरपणी, कीटकनाशकाची फवारणी ही सर्व कामे आता मशीनच्या सहाय्याने होऊ लागली आहे. एवढेच काय तर पीक काढण्यासाठी सुद्धा हार्वेस्टर मशीनचा उपयोग होऊ लागला आहे. शेतारानात चिमण्या - पाखरांचा घोंगावणारा आवाज यंत्रणाच्या आवाजात दबलेला आहे. माळराणातून शेतकºयाच्या पत्नीचे गाणे नाहीसे झाले. एवढे सर्व करूनही शेतकºयांचा विकास पूर्वीप्रमाणे होऊ शकला नाही.खताचा वारेमाप वापर, तणनाशक जाळणे यामुळे जमिनीची सुपिकता नाहीशी झाली. परिणामी निसर्गाची अवकृपा शेतकºयांच्या पाचवीला पुजलेली आहे. यातच शासनाचे दुर्लक्ष व शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी पूर्वीच्या परिस्थितीत होता. आजही त्याच अवस्थेत दिसून येत आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात यंत्राने शेतीची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:00 PM
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक जण आपला विकास साधत आहे. मग शेतकरी कसा मागे राहणार, तो हीे पुढे सरसावला व अत्याधुनिक साधनांचा उपयोग करून शेती करू लागला. त्याचा त्याला फायदाही झाला. परंतु निसर्गाची साथ तसेच शासनाची मदत न मिळाल्याने त्याचा विकास ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देशेती झाली महाग : निसर्गाची साथ अन् शासनाची मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांचा विकास ठप्प