बॉक्स
नागपूर विभागात सर्वाधिक मृत्यू
वर्षभरापासून कोरोना संकटातही कर्तव्य निभावणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा राज्यात अधिक आहे. त्यातही नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक नऊ कृषी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. आज अनेक मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. शासनाने मृत पावलेल्या कृषी सहायकांच्या कुटुंबीयांना तत्काळ ५० लाख विमा योजनेसह तत्काळ नोकरीवर घ्यावे, अशी मागणीही यावेळी सर्वानुमते करण्यात आली आहे.
कोट
शासनाने ग्रामीण स्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षकांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केले. मग कृषी सहायकांचीच काय अडचण आहे. आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात नऊ कृषी सहकाऱ्यांनी जीव गमावला आहे. राज्यशासनाने फ्रंटलाइन वर्कर घोषित करण्यासाठी राज्ज्यस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
गोपाल मेश्राम, कोषाध्यक्ष, कृषी सहायक संघटना, भंडाराकोट.
सध्याच्या परिस्थितीत शाळा ,ग्रामसभासुद्धा ऑनलाईन झाल्या आहेत. शेती शाळेसाठी शेतकऱ्यांना एकत्र करणे धोकादायक ठरू शकते. शासनाने कोणत्याही प्रकारची साधनसामग्री पुरविलेली नाही. त्यामुळे शासनाने कृषी सहायकांना सर्व सुविधा पुरवाव्यात व सर्व कामे ऑनलाईन करावीत.
गिरीश रणदिवे, कार्याध्यक्ष, कृषी सहायक संघटना, भंडारा.