सानगडी येथील शेतकरी स्नेहा वसंता खंडाईत यांची दाेन हेक्टर शेती आहे. या शेतीत धान आणि भाजीपाल्याचे पीक घेतात. त्यांनी मुख्यमंत्री कृषीपंप योजनेंतर्गत सौर सोलार पंप सेट खरेदी केला; परंतु साेमवारच्या रात्री कुण्या तरी अज्ञात व्यक्तीने सौर सोलार पंप सेटच्या प्लेट व कंट्रोलर बॉक्स किंमत ६५ हजार रुपये चोरून नेले. त्यामुळे त्यांची धान रोवणी रखडली. अलीकडे पावसाचे दिवस असले तरी पाऊस रोवणीला पाहिजे त्या प्रमाणात पडलेला नाही, रोवणीचे दिवस निघून जातील या भीतीने शेतकऱ्यांकडे असलेल्या सिंचनातून रोवणी आटोपण्याचा सपाटा सुरू झाला आहे; परंतु अशा वेळी शेतातील कृषी पंपांचे साहित्यच चोरी गेले. शेतकरी वसंता खंडाईत यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ठाणेदार जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कुळकर्णी अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
ऐन रोवणीच्या हंगामात सोलार प्लेट चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:22 AM