शेतकरी आणि पाेळा यांचे नाते अनन्य साधारण आहे. पाेळा सण हा खास बैलांचा सण असून वर्षभर राबराब राबणाऱ्या आपल्या लाडक्या सर्जा राजाच्या पूजनाचा हा दिवस हाेय. मात्र दाेन वर्षापासून काेराेना संसर्गामुळे पाेळा सण उत्साहात साजरा करताना नियमांची आडकाठी येत आहे. यंदाही जिल्हाधिकाऱ्यांनी पाेळा भरविण्यावर प्रतिबंध घातला. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले. बहुतांश गावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाेळा भरविला नाही. अगदी साधेपणाने घरच्याघरीच आपल्या सर्जा राजाची पूजा करुन त्याला पुरणपाेळी खाऊ घातली.
आता काेराेना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे अनेक गावात नियमांची भिंत ताेडून पाेळा भरविण्यात आला हाेता. अत्यंत उत्साहात बैलांना सजविण्यात आले. रंगीबेरंगी झूली टाकून बैलांना बाशिंग बांधण्यात आले. वाजतगाजत मिरवणूक काढून गावातील मैदानावर एकत्र आणले. त्याठिकाणी पाेळ्यांच्या खास झडत्या झडला. परंपरागत आणि आधुनिक झडत्यांनी पाेळा साजरा झाला.
‘अभाय गडगडे, शिंग फडफडे, जाे ताे जाये काॅन्व्हेंटकडे मराठी वाचतानी अडखडे, तरी त्याच ध्यान इंग्रजीकडे... एक नमन गाैरा हर बाेला महादेव’ असा गजर करण्यात आला. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्याचे प्रतिबिंबही पाेळ्यात दिसून आले. पाेळा रे पाेळा पाऊस झाला भाेळा शेतकरी हितासाठी सगळे व्हा गाेळा अशा झडत्याही देण्यात आल्या. शासनावरही झडत्यांमधून ताशेरे ओढण्यात आले. ‘ईकाश जन्माले याची वाट पाहूण राहिली जनता, सरकारने देला हाे नाेटबंदीचा दणका’ अशा झडत्याही देण्यात आल्या.
भंडारा जिल्ह्यात अलीकडे बैलांची संख्या कमी झाली असली तरी उत्साह मात्र कुठेही कमी दिसत नव्हता. पाेळ्याच्या सणाला सर्वजण सज्ज झाले हाेते. आता मंगळवारी तान्हा पाेळाही जिल्हाभर उत्साहात साजरा केला जाणार आहे. बच्चे कंपनी यासाठी गत महिन्याभरापासून तयारी करीत आहे.
बाॅक्स
गुडेगावात भरला ट्रॅक्टरचा पाेळा
कृषी संस्कृती बैलाना अनन्य साधारण महत्व आहे. मात्र अलीकडे यंत्राच्या सहाय्याने शेती केली जाते. बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. ट्रॅक्टरही शेतकऱ्यांचा साथी झाला आहे. त्यामुळेच साेमवारी पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे ट्रॅक्टरचा पाेळा भरविण्यात आला. एक दाेन नव्हे तर तब्बल ५० ट्रॅक्टर सजवून एकत्र आणण्यात आले. शेतकरी माेठ्या उत्साहाने यात सहभागी झाले हाेते. सजविलेल्या ट्रॅक्टरची पूजा करुन गावातून मिरवणूकही काढण्यात आली.