लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत तुमसर नगर परिषदेने स्वच्छता अभियान यशस्वी राबविला. शहराबाहेर रस्त्याशेजारी नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंचची व्यवस्था केली. सध्या येथे बसून मद्यपी मद्यप्राशन करीत आहेत. मद्यपींचा रात्री येथे ठिय्या असतो. रस्त्याशेजारी सर्रास मद्यप्राशन करणाऱ्याविरूद्ध कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.तुमसर देव्हाडी रस्त्याशेजारी गॅस गोडावून जवळ तुमसर नगरपरिषदेने नागरिकांकरिता बसण्याकरिता सिमेंट खुर्च्या लावल्या आहेत. येणारेजाणारे, सकाळी फिरायला जाणाºयाकरिता या खुर्च्यांचा उपयोग व्हावा हा उदात्त हेतू नगर परिषदेचा होता, परंतु मद्यपींनी शक्कल लावून दररोज येथे मद्यप्राशन करण्याचा आनंद उपभोगत आहेत. रस्त्याच्या शेजारी पाण्याच्या प्लास्टीक बॉटल्स व मद्याच्या बॉटल्स येथे पडून आहेत. शहरात प्रवेश करताना या स्थळाकडे पोलिसांचेही दुर्लक्ष दिसत आहे.या मार्गावर चार ते पाच ठिकाणी सिमेंट बेंच ठेवण्यात आले आहेत हे विशेष. तुमसर देव्हाडी मार्गावर दोन मद्यविक्रीचे दुकाने आहेत. तेथून मद्य खरेदी करून मद्यपी सर्रास या बेंचवर बसून मद्यप्राशन करतात. रहदारीचा हा मार्ग आहे. अनेक जणांना हे दृष्य बघतात. परंतु कुणीच वाच्यता करीत नाही. पोलिसांनी गस्त व ये जा या मार्गावर नक्की आहे. परंतु त्यांना अजूनपर्यंत मद्यपी दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चांगल्या हेतूने नगर परिषदेने उपक्रम राबविला. परंतु त्याला कशी खीळ बसवावी याची प्रतीक्षाच मद्यपी येथे करीत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने कुणाच्याही तक्रारीची वाट न पाहता याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
देव्हाडी रस्त्यावर मद्यपींचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 10:38 PM
स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत तुमसर नगर परिषदेने स्वच्छता अभियान यशस्वी राबविला. शहराबाहेर रस्त्याशेजारी नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बेंचची व्यवस्था केली. सध्या येथे बसून मद्यपी मद्यप्राशन करीत आहेत. मद्यपींचा रात्री येथे ठिय्या असतो. रस्त्याशेजारी सर्रास मद्यप्राशन करणाऱ्याविरूद्ध कारवाई कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : रस्त्याशेजारी रिकामाच मद्याच्या बाटलांचा खच