लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भारतातील संपूर्ण निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारा घेण्यात येत आहेत. संसदीय लोकशाही प्रणालीत निवडणुकांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु मतदान यंत्र हॅक होत असल्याबाबतचा संशय विविध राजकीय पक्ष संघटना व जनमाणसात बळावत आहेत. निर्दोष निवडणुका पार पाडण्यासाठी मतदान यंत्राऐवजी मत्तपत्रिकेद्वारा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी लाखांदूर तालुका काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.१९९० च्या दशकात मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारा पार पडली जायची. परंतु निकाल प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे ईव्हीएम मशीनचा वापर निवडणुकीत करण्यात आला. ईव्हीएम मशीनमध्ये घोळ व मशीन हॅक होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये होणारी निवडणूक प्रक्रिया ही मतपत्रिकेतद्वारा पार पाडली जात आहे. भारत देशाने संसदीय लोकशाही प्रणाली अंगीकारल्यामुळे येथील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध पक्ष, संघटना व जनसामान्यांचा ईव्हीएमवरील विश्वास राहिला नाही. लोकशाहीचे मूल्ये जोपासण्यासाठी निवडणूक आयुक्त व निर्वाचन आयोग यांनी कुठल्याही राजकीय दबावात काम न करता देशहितासाठी देशात होणाºया निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून केली आहे.शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे, मनोहर राऊत, शुद्धमर्ता नंदागवळी, नानाजी पिलारे, प्रकाश देशमुख, रामचंद्र परशुरामकर, सचिन नंदनवार, विजय भुरले, रमेश पारधी, निलिमा टेंभुर्णे, रमेश भैय्या, युवराज पारधी, दीपक बगमारे, श्रीराम भुते, लेखदास ठाकरे, रामचंद्र राऊत, मेहबूब पठाण, सुरेश वाघमारे, खेमराज कोडापे, रमेश बगमारे, मीनाक्षी पारधी, छाया बगमारे आदींचा समावेश होता.
देशातील सर्वच निवडणुका मतपत्रिकांद्वारे घ्याव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:15 AM
भारतातील संपूर्ण निवडणुका ईव्हीएम मशीनद्वारा घेण्यात येत आहेत. संसदीय लोकशाही प्रणालीत निवडणुकांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु मतदान यंत्र हॅक होत असल्याबाबतचा संशय विविध राजकीय पक्ष संघटना व जनमाणसात बळावत आहेत.
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : लाखांदूर तालुका काँग्रेसची मागणी