लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तथा मोहाडी तालुक्यात ठिकठिकाणी अल्प आहाराची स्थायी अस्थायी दुकाने असंख्य प्रमाणात पहायला मिळतात. त्यात दोन्ही तालुक्यातील लोक चविष्ट खाद्यपदार्थ खाण्याचे शौकीन. पदार्थ खाण्याची सवय लागली की खाणारा व्यक्ती पदार्थाच्या दर्जेचे किंवा त्यांच्या सुरक्षेचे भान हरपून बसतो. मग उद्भवतात दूषित अन्नातून पसरणारे रोग व अपाय. याचेच महत्व व गांभीर्य समजावून सांगण्यासाठी अन्न सुरक्षा विभागाच्या वतीने सहयोग सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात खाद्य पदार्थाच्या सुरक्षेबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.कार्यशाळा ६ आॅक्टोबरला दुपारी घेण्यात आली. कार्यशाळेत तुमसर व मोहाडी तालक्यातील रस्त्यालगत उघड्यावर खाद्य पदार्थ विकणाºयांपासून तर स्थायी हॉटेल रेस्टारंट व महाप्रसाद आयोजित करणाºया मंडळांना निर्देश देण्यात आले. चिल्लर तथा ठोक मिठाई विक्रेते यांना देखील अन्न पदार्थाच्या सुरक्षितेबाबत कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करण्यात आले.कार्यशाळेत सहआयुक्त शशिकांत केकरे, सहाय्यक आयुक्त मिलींद देशपांडे अन्न व औषधी भंडारा, भाजप जिल्हाध्यक्ष मोहम्मद तारीक कुरैशी, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, अन्न पुरवठा अधिकारी महाजन, देशपांडे, राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. स्मिता ठवकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.प्रशिक्षक स्मिता ठवकर यांनी स्वच्छतेतून कशाप्रकारे निरोगी आरोग्य साधता येते यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, शहरात रस्त्यालगत ते स्थायी हॉटेलपर्यंत कुठेही खाद्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई नाही. परंतु काही निवडक सुरक्षा जर अवलंबली तर अन्न सुरक्षेच्या तसेच मानवी आरोग्याला लाभदायक बाबी साध्य करता येऊ शकतात. स्मिता ठवकर यांनी कार्यक्रमात बोलताना खाद्य पदार्थ विक्रेत्यांना दिशानिर्देश देताना सांगितले की, हॉटेल असो किंवा रस्त्याच्या कडेवरील हातठेल्यावरील विक्रेते असो त्यांनी खाद्य पदार्थ विकतांना किंवा ग्राहकाला त्याच ठिकाणी खावयास देताना प्लेटस् स्वच्छ आहे याची नोंद घ्यावी.पदार्थ विकताना हातमोजे वापरावे, ग्राहकांच्या मार्फत प्लेटस्मध्ये उरलेले पदार्थ यांची योग्य विल्हेवाट लावण्याची सोय करावी. हॉटेलच्या दर्शनी भागात विक्रीकरिता ठेवलेले पदार्थ हे उघडे न ठेवता ते पारदर्शी नेटच्या झाकून ठेवावे किंवा काचाचे स्वच्छ रकाने तयार करून त्यात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी शहराला स्वच्छ व निरोगी बनविण्याच्या उद्देशाने कार्यक्रमात आपले मत मांडले.पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत निरोगी भारताचे स्वप्न जर साकार करायचे असतील तर नागरिकांनीच आपली नैतिक कर्तव्य पार पाडली पाहिजेत. तेव्हाच पुरविण्यात येणाºया या योजना पूर्णत्वास येतील असे पडोळे यांनी सांगितले.कार्यक्रमासाठी तुमसरचे व्यापारी संघ व अन्न व औषधी प्रशासन महाराष्ट्र राज्य तसेच दिनेश नागपोता, दिपक खंडेलवाल, शैलेश थानथराटे, मोहन आसवानी, गोपाल जोशी, विष्णू आहूजा, सुनिल अग्रवाल यांनी सहकार्य केले.कार्यशाळेचे आभार प्रदर्शन नागपोता यांनी केले. यावेळी नागरिकांसह व्यावसायीकांची मोठी उपस्थिती होती.
तुमसरात अन्न सुरक्षा विभागाची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 10:42 PM
तुमसर तथा मोहाडी तालुक्यात ठिकठिकाणी अल्प आहाराची स्थायी अस्थायी दुकाने असंख्य प्रमाणात पहायला मिळतात.
ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : खाद्य पदार्थ विकणाºयांना अन्न सुरक्षेबाबत दिशानिर्देश