लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या विविध विभागाच्या सेवा विहित मुदतीत नागरिकांना देण्यासाठी लोकसेवा हमी हक्क कायदा राज्यात लागू केला आहे. या कायद्यांतर्गत अधिसूचित केलेल्या ४८६ सेवा नागरिकांना देण्यासाठी सर्व सेतू सुविधा केंद्रावर अर्ज स्विकारावे, अशी सूचना मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी येथे दिल्या.भंडारा जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र, उपविभागीय कार्यालय, नगरपरिषद, भूमिअभिलेख कार्यालय, गणेशपूर ग्रामपंचायत आणि भंडारा जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, मनिषा कुरसंगे, भूमिअभिलेख अधीक्षक एम.बी. पाटील, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते.लोकसेवा हक्क कायद्या प्रभावी अंमलबजावणीची पाहणी स्वाधिन क्षत्रिय यांनी बुधवारी केली. प्रशासकीय इमारतीतील सेतू सुविधा केंद्राला भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर नगरपालिका कार्यालयाला भेट देवून विविध सेवांचा आढावा घेतला. भूमिअभिलेख कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवाबाबत माहिती जाणून घेतली. गणेशपूर ग्रामपंचायतीतील भेट देवून त्यांनी पाहणी केली. या कार्याबाबत नागरिकात व्यापक जनजागृती करण्याची सूचना दिली.अधिसूचित केलेल्या ४८६ सेवांची माहिती जिल्ह्याच्या तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. या सेवांपैकी महत्वाच्या तसेच वारंवार मागणी होणाऱ्या २० सेवांची यादी सेतू सुविधा केंद्रावर प्रसिद्ध करावी, असे त्यांनी सांगितले.३९८ सेवा ऑनलाईनअधिसूचित केलेल्या ४८६ सेवांपैकी ३९८ सेवा ऑनलाईन असून उर्वरित सेवा ऑफ लाईन आहे. या सेवाही लवकरच ऑनलाईन करण्यात येतील, असे स्वाधिन क्षत्रिय यांनी सांगितले. सर्व सेवांचे अर्ज सेतू केंद्रावर स्विकारावे, असा शासन निर्णय नगरविकास खात्याने निर्गमित केल्याचे ते म्हणाले. सेवा हक्क हमी कायद्याची सेवा अॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी हे अॅपलीकेशन डावूनलोड करावे, असे त्यांनी सांगितले.
अधिसूचित सर्व सेवांचे अर्ज सेतू केंद्रावर स्वीकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 1:28 AM
भूमिअभिलेख कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवाबाबत माहिती जाणून घेतली. गणेशपूर ग्रामपंचायतीतील भेट देवून त्यांनी पाहणी केली. या कार्याबाबत नागरिकात व्यापक जनजागृती करण्याची सूचना दिली. अधिसूचित केलेल्या ४८६ सेवांची माहिती जिल्ह्याच्या तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी.
ठळक मुद्देस्वाधिन क्षत्रिय : मुख्य लोकसेवा हक्क आयुक्तांची बैठक