लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने पुन्हा एकदा जिल्ह्यात कृपादृष्टी बरसवली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरु असून रोवणीसह शेतीच्या कामाला जोर आला आहे. सातही तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची माहिती आहे. सखल भागात पाणी शिरल्याने काही गावांमध्ये जाण्याचे रस्ते बंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.बुधवार रात्रीपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर पाऊस बरसला. बुधवारी जिल्ह्यात सरासरी ११.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परंतु गुरुवारी काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. मात्र यामुळे किती घरांची पडझड अथवा कुठे नुकसान झाली याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही. कारधा येथे वैनगंगा नदीची पातळी ६.३६ मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. तर गोसेखुर्द धरणाची पातळी २४३.३६ मीटर आहे. सायंकाळी धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले होते. भंडारा तालुक्यांतर्गत आतापर्यंत सहा मंडळांतर्गत ६७ टक्के पाऊस झाला आहे. यासह मोहाडीच्या सहा मंडळांतर्गत ६२, तुमसर तालुक्यांतर्गत येणाऱ्या पाच मंडळामध्ये ७२ टक्के, पवनी तालुक्यांतर्गत येणाºया सहा मंडळामध्ये १३३ टक्के, साकोली तालुक्यांतर्गत येणाºया तीन मंडळामध्ये ७८ टक्के, लाखांदुरात ८२ टक्के तर लाखनीच्या चार मंडळांतर्गत ६० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.पावसामुळे जनजीवन विस्कळीतसंततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. चार दिवसांपूर्वी ओसरलेला पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढे खळखळून वाहू लागले आहेत. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही जाणवला. पाण्याची झळ सतत सुरु असल्याने अनेकांना घराबाहेर निघणेही मुश्कील झाले. दमदार पावसामुळे रोवणीच्या कामाला जोर आला असला तरी शिवारात चिखल करण्यासाठी बळीराजाला पावसाच्या उसंतची गरज आहे. पावसामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात एसटी बसेसचे वेळापत्रक कोलमडल्याचे चित्र होते. पवनी, लाखांदूर, साकोली तालुक्यात अतिवृष्टीची माहिती आहे.
जिल्ह्यात सर्वदूर संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 12:57 AM
चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर वरुण राजाने पुन्हा एकदा जिल्ह्यात कृपादृष्टी बरसवली आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार सुरु असून रोवणीसह शेतीच्या कामाला जोर आला आहे. सातही तालुक्यासह ग्रामीण भागात पाऊस बरसल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देरोवणीला वेग : वैनगंगेचा जलस्तर वाढला, गोसे धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले