आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्ह्यातील पोलिसांच्या सक्षमीकरणासोबत जनतेचे संरक्षण महत्त्वाचे आहे. पारंपरिक गुन्हे पध्दतीत आमुलाग्र बदल झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.भंडारा जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आयोजित ‘टेक एक्स्पो २०१८’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनिल कुळकर्णी उपस्थित होते.यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, भंडारा पोलीस दलाने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. टेक एक्स्पो हे प्रदर्शन पोलिसांच्या आधुनिकी करणाचे महत्त्व विषद करणारे आहे. भंडारा शहरातील गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येईल. याशिवाय तालुक्याचे शहर व मोठया गावात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाईल. पोलीस विभाग हायटेक करण्यासाठी यापुढेही निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.वीज चोरीचे गुन्हेसुध्दा आता पोलीस ठाण्यात नोंदविण्यासाठी शासन आदेश निर्गमित झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात वीज चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी दोन पोलीस ठाणे असणार आहेत. या ठिकाणीच वीज चोरीचे गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया होईल.यावेळी आमदार डॉ.परिणय फुके व जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची समयोचित भाषणे झाली. टेक एक्स्पोच्या आयोजनामागची भूमिका जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी प्रास्ताविकातून मांडली. शासनाने तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला असून तंत्रज्ञान व सोशल मीडियामध्ये घडणाºया गुन्ह्यांपासून संरक्षण व्हावे याबाबतची माहिती या प्रर्दशनाच्या माध्यमातून जनतेला दिली जाणार आहे. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद ठवकर व स्मिता गालफाडे यांनी तर आभारप्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी केले.महिनाभरात होणार ग्रामरक्षक दल गठितअवैध व्यवसायाला व अवैध दारूला आळा घालण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिनाभरात ग्रामरक्षक दल गठित केले जातील असे पालकमंत्र्यांनी सांगितले. अवैध दारू व अवैध व्यवसायासंबंधी ग्रामरक्षक दलाने तक्रार केल्यास १२ तासाच्या आत आळा घालण्याचे काम पोलीस विभागाने करावे, असे या कायद्यात नमुद आहे.अशी आहे प्रदर्शनीया प्रदर्शनीत फिरते पोलीस ठाणे, सायबर क्राईम, शस्त्र व दारू गोळा, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वाहतुक नियंत्रण सायबर फॉरेन्सिक, अंगुली मुद्रा केंद्र, नक्षल विरोधी अभियान, अंमली पदार्थ विरोधी शाखा, बिनतारी संदेश, दामिनी पथक, आॅनलाईन एफआयआर, महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र लोकराज्य, महिला बाल विकास विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलवर नागरिकांना तंत्रज्ञान व तंत्रज्ञानाशी संबंधित बाबींची माहिती दिली जाणार आहे.
सर्वच पोलीस ठाणे हायटेक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 10:56 PM
जिल्ह्यातील पोलिसांच्या सक्षमीकरणासोबत जनतेचे संरक्षण महत्त्वाचे आहे. पारंपरिक गुन्हे पध्दतीत आमुलाग्र बदल झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : पोलीस टेक एक्स्पोचे उद्घाटन, भंडारा शहरात लागणार सीसीटीव्हीचे जाळे