शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सर्व शिक्षक संघटनांचा शाळा बंदचा निर्णय; संचमान्यतेसह कंत्राटी शिक्षक भरती निर्णयाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:13 PM

Bhandara : शासन निर्णय खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : शालेय शिक्षण विभागाकडे शिक्षक संचमान्यता व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा शासन निर्णय खेड्यापाड्यातील वाडीवस्तीवरील आणि विद्यार्थ्यांवर अन्यायकारक करणारा आहे. परिणामी दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे..

शिक्षक समन्वय समितीच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील एक शिक्षक कमी होऊन १५ हजारांवर शाळांमधील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. हा शासन निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा, असे मत राज्यातील सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. 

अधिनियमातील तरतुदीनुसार प्राथमिक स्तर इयत्ता १ ते ५ व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता ६ ते ८चा आकृतिबंध अद्याप लागू केलेला नाही. आकृतिबंध लागू करण्याबाबत शासन निर्णयही झालेला आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचे अधिनियम याचे उल्लंघन होत आहे. 

जिल्हा परिषद शिक्षक समन्वय समितीने घेतला हा निर्णय 

  • दरम्यान १८ सप्टेंबरला जिल्हा परिषद भंडारा शिक्षक समन्वय समतीची बैठक पार पडली. बैठकीत २५ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी किरकोळ रजा टाकून मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी उपस्थित राहावे, असे ठरविण्यात आले. हा मोर्चा नगर परिषद गांधी विद्यालय भंडारा येथून दुपारी १२ वाजता निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचेल.
  • आंदोलनाच्या स्वरूपामध्ये १९ तारखेपासून काळी फित लावून शासन निर्णयाचा विरोध करणे, सर्व प्रकारच्या प्रशासनिक व्हाट्सअप ग्रुप वरून बाहेर पडणे, १९ सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व संघटनाच्या पदाधिकारी यांनी शिक्षक जागृती करिता सभा लावून नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. जिल्ह्यातील कुठल्याही शाळा सुरू राहू नयेत, याची सर्वांनी दक्षता घ्यवी, असा निर्णय जिल्हा परिषद शिक्षक समन्वय समिती भंडारातफ घेण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, पद- वीधर शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, शिक्षक भारती संघटना, सहकार शिक्षक संघटनाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा