शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

वाळू उत्खनन विरोधात सरपंचाचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 6:00 AM

रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात गुन्हेगारीकडे ओढला जात आहे.

ठळक मुद्देआमरण उपोषण सुरू : वाहतुकीमुळे सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : तालुक्यातील वलनी (चौरास) येथील रेती घाटावरून अवैध वाळूचे उत्खनन धडाक्यात सुरु असल्याने गावातील मुलभूत सुविधांना बाधा पोहचत आहे. यासंदर्भात सरपंचानी प्रशासनाला निवेदन दिले. परंतु कार्यवाही न केल्यामुळे ६ नोव्हेंबर पासून उपोषणाचा मार्ग स्वीकारला अआहे. तहसील कार्यालयासमोर सरपंच व ग्राम पंचायत सदस्य आमरण उपोषणाला बसले आहेत.रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणारी ट्रक, टिप्पर, ट्रक्टर आदी वाहनाच्या वर्दळीमुळे गावातील रस्ते, नाल्या, विद्दूत खांब, अशा सर्व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावातील तरुण कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या नादात गुन्हेगारीकडे ओढला जात आहे. याप्रकाराला आळा घालण्यासाठी व अवैध रेती उत्खनन थांबविण्यासाठी कठोर कार्यवाही व्हावी म्हणून वलनी ग्राम पंचायतचे सरपंच दीपक तिघरे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदने दिले आहे.मात्र यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही अधिकाऱ्यांनी केलेली नाही. त्यामुळे रेती तस्कर गावातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांना तसेच गावकºयांना न जुमानता राजरोसपणे अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक करीत आहेत. रेती तस्करांना गावातील कोणी काही बोलल्यास जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे गावातील जबाबदार व्यक्ती म्हणुन सरपंच दीपक तिघरे, उपसरपंच धनवंता हटवार, सदस्य लक्ष्मी मेश्राम, योगिता तिघरे, किशोर मेश्राम, पुरुषोत्तम सेलोकर, विनायक गभने, शंकर मेश्राम, ग्रामस्थ के. टी. हटवार, माधव वंजारी, खेमराज तिघरे हे ६ नोव्हेंबर पासून उपोषणाला बसले आहेत.मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले असून त्यात अवैध रेती उत्खनन त्वरीत थांबविण्यात यावे, वलनी घाटावर तत्काळ महसूल विभागाची चौकी लावण्यात यावी, पोलीस विभागाची गस्त वाढविण्यात यावी, रेती घाटाचा लिलाव लवकरात लवकर करण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश आहे.वलनी घाटावर 30 ऑक्टोम्बर पासून चौकी लावालेली आहे. तलाठी, पोलीस पाटील कोतवाल यांना अवैध रेती उत्खननावर लक्ष ठेवून तात्काळ माहिती द्यावी असे निर्देश दिले आहेत. घाटावरुन अवैध रेती उत्खनन होतांना आढळून आलेले नाही.-गजानन कोकुर्डे, तहसीलदार, पवनी.

टॅग्स :sarpanchसरपंचsandवाळू