भाव कमी होऊनही स्थिती ‘जैसे थे’ : राज्य परिवहन महामंडळाविरुद्ध प्रवाशांमध्ये कमालिचा संतापइंद्रपाल कटकवार - भंडारा जेव्हा-जेव्हा डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली, तेव्हा-तेव्हा राज्य परिवहन महामंडळाने एस.टी.ची भाडेवाढ केली आहे. मागील सात महिन्यात डिझेलचे भाव चारवेळा कमी झाले. परंतु, परिवहन मंडळाने तिकिटाच्या दरात कोणतीही घट केलेली नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या या महामंडळाकडून प्रवाशांना दिलासा मिळेल, असा निर्णय घेण्यात आलेला नाही. आठ ते दहा रूपयांनी डिझेलचे भाव कमी झाल्यामुळे एसटीचे दर कमी व्हायला पाहिजे होते. परंतु महामंडळाने दर कमी केलेले नाही. त्यामुळे एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी की लुटीसाठी हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला अहे.‘गाव तिथे एसटी’ ही संकल्पना साधत राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. प्रवाशांसाठजी आजमितीला जवळपास १४ प्रकारच्या सवलती योजना कार्यान्वित आहेत. यात आर्थिक स्थितीला अनुसरून प्रवाशी त्या योजनांचा लाभही घेत आहेत. १४ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे आहेत. भंडारा विभागातंर्गत सहा आगार असून त्यात भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, पवनी व साकोली तर गोंदिया जिल्ह्यात तिरोडा आणि गोंदिया आगाराचा समावेश आहे.एसटीला ‘लोकवाहिनी असेही संबोधले जाते. एसटीचा प्रवास ‘सुरक्षित प्रवास’ असेही म्हटले जाते. एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे एसटीची दररोजची उलाढाल लाखोंच्या घरात आहे. मात्र मागीलवर्षी डिझेलची दरवाढ होताच महामंडळानेही एसटीची भाडेवाढ केली होती. मागीलवर्षी म्हणजे ८ नोव्हेंबर २०१३ रोजी एसटीने पहिली दरवाढ केली होती. यात त्यावेळी प्रति सहा किलोमीटर मागे १५ पैशांची (जलद व साधारण बस) तर निमआराम बसच्या प्रवाशात २० पैशांनी दरवाढ करण्यात आली होती. चारवेळा भाडेवाढयावर्षी ७ मार्च २०१४ रोजी जलद व साधारण बसच्या भाड्यात पुन्हा १५ पैसे तर निमआराम बसच्या प्रवाशात २० पैशांनी दरवाढ करण्यात आली होती. सन २०१४ मध्ये १ जून, ३१ जुलै आणि २२ आॅगस्ट रोजी एसटीने भाडेवाढ केली. डिझेलचे भाव कमी होत असताना एसटी महामंडळाने दरवाढ करण्याचा सपाटा मात्र कायम ठेवला. तांत्रिक कारण आणि वित्तीय तुट भरून काढण्यासाठी हा प्रयत्न असला तरी त्याचा फटका सरळसरळ प्रवाशांच्या खिशावर बसला. त्यामुळे प्रवाशांमध्येही असंतोष आहे.
डिझेलचे दर घटले तरी एसटीचे दर कायमच
By admin | Published: December 24, 2014 10:53 PM