भंडारा : अलीकडे भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे. खुटसावरी येथे धान खरेदी केंद्राला उशीर झाला असला तरी सर्व अटी-शर्ती पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. या कार्यात कोणताही भेदभाव न बाळगता प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे शेरा सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या वतीने रविवारी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शेषराव शेंडे होते. यावेळी अनिल गायधने, राजेश सार्वे, दिगांबर गाढवे, बंडु थोटे, कन्हैया भुते, शीतल शेंडे, अंजली वासनिक, श्रावण दिघोरे, धनराज कायते, गौतम शिडाम, सुखदेव मस्के आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
भोंडेकर म्हणाले, गत दोन महिन्यांपासून खुटसावरी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करण्यात आल्यानंतरही परवानगी देण्यात आली नव्हती. परिणामी शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी दूरवर पायपीट करावी लागली. त्यानंतर शासन-प्रशासनाला पाठपुरावा करण्यात आला. बहुप्रतीक्षेनंतर धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रात एकमेव खुटसावरी येथे धान खरेदी केंद्राची परवानगी मिळाली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या केंद्राचा लाभ मिळणार आहे. संचालन व आभार प्रदर्शन राजेश सार्वे यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, संदीप खंडाते, राकेश शेंडे, संगीता बोरकर, ऋषाली शहारे यांच्यासह सत्यवान पेशने, बाबुराव भुते, आसाराम शेंडे, उमराव मस्के, अरविंद मस्के, चुडामन ढवळे, बाबुलाल कोटे, भास्कर सार्वे, अमरदीप बोरकर, विलास भुते, संघदीप भोयर, पुरुषोत्तम लांजेवार, रमेश गिऱ्हेपुंजे, गुड्डु मस्के, ईश्वर बन्सोड, शरद भुते, धनराज गायधने, श्रावण गिऱ्हेपुंजे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.