लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : होळी सणासाठी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या दारु अड्ड्यांवर भंडारा पोलिसांनी धाड मारून सहा पेट्या देशी दारुसह १५ लिटर गावठी दारु जप्त केली. ही कारवाई शहरातील गांधी वॉर्डात करण्यात आली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.भंडारा शहरातील गांधी वॉर्डातील संत रोहिदास मंदिराजवळ एका घरी देशी व गावठी दारु विकली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण यांना मिळाली. त्यावरून त्यांच्या मार्गदर्शनात धाड मारली. भीमराव बाबूराव बर्वे यांच्या घरी तीन पेटी देशी दारु किंमत ७ हजार ८०० रुपये, दोन पेटी संतरा देशी दारु किंमत ४ हजार ९९२ रुपये आणि एक पेटी प्रिमियम सोप दारु किंमत २ हजार ४९६ रुपये तसेच एका रबरी ट्युबमध्ये १५ लिटर मोहफुलाची दारु आढळून आली. ही सर्व दारु पोलिसांनी जप्त केली. भीमराव बर्वे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण, पोलीस निरीक्षक अमरदिप खाडे, पुरुषोत्तम शेंडे, बापूराव भुसावळे, साजन वाघमारे, अजय कुकडे, संदीप बन्सोड, ज्योती तितीरमारे यांनी केली.होळीसाठी साठाहोळी सणाच्या निमित्ताने मद्यविक्रीस प्रतिबंध असल्याने अनेक ठिकाणी दारुचा साठा करून ठेवण्यात आला आहे. या साठ्यावर पोलिसांची करडी नजर असून त्यातूनच गांधी वॉर्डात धाड मारुन दारु जप्त करण्यात आली.
होळीच्या पार्श्वभूमीवर दारु अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 10:02 PM
होळी सणासाठी अवैधरित्या साठवून ठेवलेल्या दारु अड्ड्यांवर भंडारा पोलिसांनी धाड मारून सहा पेट्या देशी दारुसह १५ लिटर गावठी दारु जप्त केली. ही कारवाई शहरातील गांधी वॉर्डात करण्यात आली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
ठळक मुद्देगांधी वॉर्डात कारवाई : एकास अटक, सहा पेट्या देशी दारु