लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मागील अडीच महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाची थकीत रक्कम अद्याप मिळाली नाही. ऊस उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे बघितले जाते. येथे उधारीवर ऊस कारखान्याला दिले काय, असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे. २९ जानेवारीपासून कारखान्यासमक्ष आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिना संपण्याच्या मार्गावर आहे. सुमारे ८०० ते ९०० शेतकºयांचे ऊसाची रक्कम अजुनपर्यंत मानस एॅग्रो कारखान्याने दिली नाही. अनेकदा शेतकरी प्रत्यक्ष साखर कारखान्यात जाऊन थकीत रकमेची मागणी केली. परंतु ऊस उत्पादक शेतकºयांच्या पदरी निराशाच पडली. यापुढे ऊसपीक न घेण्याचा निर्णयही येथील शेतकºयांनी घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकºयांनी ऊस पिकाकरिता खत तथा पाण्याकरिता पैसा खर्च केला. काहींनी कर्ज घेतले. रब्बी पिकांकरिता शेतकºयांना सध्या पैसा हवा आहे. कारखाना हक्काचे पैसे देत नाही. त्यामुळे शेतकºयांना असंतोष खदखदत आहे.सोमवारला पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, काँग्रेसचे युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे, कमलाकर निखाडे, रविंंद्र सार्वे, भुपेंद्र साठवणे, देवदास साठवणे, गौरीशंकर पंचबुद्धे, भूषण गायधने यांनी कारखान्याचे व्यवस्थापक विजय राऊत यांची भेट घेवून शेतकºयांचे थकीत पैसे देण्याची मागणी करून चर्चा केली. २९ जानेवारीपूर्वी शेतकºयांना ऊसाची थकीत रक्कम न मिळाल्यास कारखाण्यासमक्ष उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला. येथे सदर कारखाना प्रशासन मागील महिन्याभरापासून आठवड्याभरात थकीत रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगत आहे. परंतु ती मिळाली नाही. म्हणून टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिष्टमंडळातील पदाधिकाºयांनी सांगितले.
अडीच महिन्यांपासून ऊस उत्पादकांची रक्कम थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:46 PM
मागील अडीच महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाची थकीत रक्कम अद्याप मिळाली नाही. ऊस उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे बघितले जाते. येथे उधारीवर ऊस कारखान्याला दिले काय, असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे. २९ जानेवारीपासून कारखान्यासमक्ष आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यात असंतोष : २९ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा, कारखाना व्यवस्थापनाला निवेदन