शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

रक्त वाहून नेणारे वातानुकुलीत वाहन राष्ट्रीय महामार्गावर जळून खाक

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: May 26, 2024 6:31 PM

वाहनचालक सुरक्षित : मध्यरात्रीपर्यंत वाहतूक दुतर्फा ठप्प

भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर शुक्रवारी रात्री १०:३० वाजताच्या दरम्यान रक्त वाहून नेणाऱ्या वातानुकुलीत वाहनाला अचानक आग लागली. काही वेळातच वाहनाला पूर्णत: आग लागून जळून खाक झाले. ही घटना महामार्गवरील राजेगाव एमआयडीसी फाट्याजवळ घडली. यामुळे मध्यरात्रीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने कसलीही प्राणहानी झाली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन नागपुरातील लाईफ लाईन ब्लड बँकेचे असून त्याचा क्रमांक केए ५० / बी २६०९ असा आहे. अशोक लेलँड कंपनीचे हे वाहन जवळपास ४५ रक्ताच्या पिशवीो बॉक्स घेऊन नागपूरहून रात्री ९ वाजताच्या सुमारास रायपूरला जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, रात्री १०:३० वाजताच्या सुमारास राजेगाव एमआयडीसी फाट्यावरून जाताना या वाहनाच्या मागून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे वाहन थांबवून तो खाली उतरला. एवढ्यात वाहनाने अचानकपणे पेट घेतला. वाहन संपूर्ण वातानुकूलित असल्यामुळे वेगाने हे वाहन पेटून जळून खाक झाले.

ऐन महामार्गवर घडलेल्या या प्रकारामुळे मार्गवरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी आणि नागिरकांनी पोलिसांना कळवून भंडारा व लाखनी अग्निशामक दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्नीशामक दलाच्या वाहनांनी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत वाहन पूर्णत: आगत स्वाहा झाले होते. त्यातील रक्ताच्या बॅगचे काही बॉक्स वाचविण्यात यश आले असले तरी बहुतांश बॉक्स आगीत जळाले.

२० ते २२ लाखाचे नुकसानलाखनी पोलिसांच्या मते, हे वाहन वातानुकूलित असल्याने आतील एयर कंडीशनरने पेट घेतला असावा. त्यामुळे वेगाने आग पसरून वाहन जळाले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. या वाहनासोबत चालकासह वाहन मालकही होते. मात्र स्टेशन डायरीवर घटना नोंद न झाल्यामुळे दोघांचीही नावे कळू शकली नाही. यात साधारणत: २० ते २२ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज रात्री कर्तव्यावर असलेले हवालदार रामटेके यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराfireआग