देवानंद नंदेश्वर
भंडारा : भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे तलावालगतच्या सिल्ली - गराडा पांदण रस्त्यावर अंदाजे तीस वर्षीय युवतीला पडलेल्या अवस्थेत बघून शेती कामासाठी गेलेल्या शेतमजूर महिलांनी गावात माहीती दिली. सिल्लीतील पदाधिकारी घटनास्थळी पोहचले. त्या महिलेला बोलता येत नव्हते. तिची भाषा वेगळी असल्यामुळे पूर्णतः माहिती मिळू शकली नाही. पण तिला इंग्लिशमध्ये नाव लिहिता आले.
तीला गावात आणून जेवण व कपडे परिधान करून दिले गावात ती अनोळखी महिला सकाळी सात च्या सुमारास पाहीले असल्याचे सांगण्यात आले. तिने एका हॉटेल मध्ये सकाळी नास्ता केल्याचेही सांगत होती .मात्र ती अनोळखी महिला या खेडे गावात पोहचली कशी? तिला कोणी आणले असावे,? तीच काही बर वाईट झाले असेल काय ? अशा चर्चेला पेव फुटला असल्याने खळबळ माजली आहे.
ग्रामवासियांनी त्या महिलेला कारधा पोलिस स्टेशनमध्ये पोहचविले, तेव्हा तिने इंग्रजीत रूपा नाव लिहिले असे सांगण्यात आले. अधिक तपास पोलिस नायक विकास जाधव व सिल्ली बीटचे विनायक साठवणे करीत आहेत.