शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

अन् बालकांच्या कलाविष्काराने सर्वच भारावले

By admin | Published: February 03, 2016 12:44 AM

लोकमत बालविकास मंच व स्कूल आॅफ स्कॉलर भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बाल महोत्सवात बालकांच्या कलाविष्काराने उपस्थित मंडळी भारावून गेली.

२७ शाळांतील ३०० स्पर्धकांचा सहभाग : उत्कृष्ट शाळा बहुमान स्कूल आॅफ स्कॉलर्सला, बाल विकास मंचचा उपक्रमभंडारा : लोकमत बालविकास मंच व स्कूल आॅफ स्कॉलर भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बाल महोत्सवात बालकांच्या कलाविष्काराने उपस्थित मंडळी भारावून गेली. या महोत्सवासाठी जिल्ह्यातील २७ शाळेतील ३०० स्पर्धकांनी संधीचे सोने करत कलाविष्कार केला. विजयी व उपस्थित स्पर्धकांना स्मृतिचिन्ह, भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन सायन्स करिअर अकॅडमीचे संचालक नरेंद्र पालांदूरकर, स्कुल आॅफ स्कॉलरच्या मुख्याध्यापिका कार्यक्रमाध्यक्ष ईरा शर्मा सामाजिक कार्यकर्ता संजय धोटे, विलास शेंडे, विभाग प्रमुख रंजिता देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री गणेशवंदना कृतिका सुर व खुशी ठोंबरे यांनी तर प्रिया थोटेने आपल्या सुरेल गिताने पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमात अनुक्रमे एकापेक्षा एक कला टॅलेंट हन्ट, एकल नृत्य, एकपात्री अभिनय बेस्ट ड्रामेबाज, समूह नृत्य व उत्कृष्ट निवेदक याप्रमाणे स्पर्धा घेण्यात आल्या. शालेय निवड चाचणी व प्राथमिक फेरी मधून यशस्वी स्पर्धकांची निवड करण्यात आली. जिल्हास्तरीय स्पर्धेत कला सादरीकरणाची संधी देण्यात आली. एकापेक्षा एक स्पर्धेत सिंथेसाइजर वादन व गायन करून महिला समाज शाळेतील वेदांत बारस्कर प्रथम, मृदूंग व तबला वादन करून महर्षि विद्या मंदीरचा विद्यार्थी अनिमेश विनोद पत्थे हा द्वितीय तर स्प्रिंग डेल शाळेचा विद्यार्थी शौर्य घाटबांधे याने कॅसिओ वादनात तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रोत्साहनपर प्रथमेश रामेदवार, प्रणव पंचबुधे, पुर्वा बारस्कर, पियुष चंदवास्कर यांची निवड करण्यात आली. एकलनृत्य स्पर्धेत महिला समाज शाळेची राधा माने हिने ‘मला लागली कुणाची उचकी’ या लावणीवर बहारदार नृत्य सादर करून परीक्षकांची मने जिंकून प्रथम क्रमांक मिळविला. ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या गीतावर स्प्रिंग डेलची श्रिया टांगलेने द्वितीय क्रमांक तर महर्षि विद्या मंदिरची चेतश्री पशिने ‘झिलो का शहर’ या चित्रपट गीतावर अदाकार नृत्य सादर करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रोत्साहनपर यशस्वी धवड, कृपाली लांजेवार, आर्या नंदनवार, प्राची चौधरी, साई सलामे, सलोनी भांडारकर, मौसमी गायधने, राजश्री शेंडे, मानसी गजभिये, खुशी नंदागवळी, धनश्री देशमुख, प्रतीक्षा उपथडे, प्राप्ती मदनकर, मोदित खोब्रागडे, टिशा झाडे यांची निवड करण्यात आली. एकपात्री अभिनय बेस्ट ड्रामेबाज स्पर्धेत महर्षि विद्या मंदिरचा जय सेलोकर योन ‘माऊलीची’ भूमिका साकारून प्रेक्षकांची वाहवा मिळविली व प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. माइंड्स आय इंटरनॅशनल स्कुलचा वार्षिक वाघाये याने विद्यार्थ्यांची भूमिका सादर करून द्वितीय क्रमांक तर विनोदी भूमिका साकारून रॉयल पब्लिक स्कूलचा चेतन कोटांगले याने पर्यावरण वाचवा संदेश देत तृतीय क्रमांक प्राप्त केला. अश्वजीत आंभोरे, मानस घरडे, अन्वय गजभिये, सादात वरकडे व प्रद्युम्य धुळसे यांना प्रोत्साहनपर निवडण्यात आले.समुहनृत्य स्पर्धेत 'ओरी चिरैया' या गितावर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' हा संदेश देत महिला समाज शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवित उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले, द्वितीय क्रमांक स्कूल आॅफ स्कॉलरच्या संघाने अध्यात्मिक गितावर शास्त्रीय नृत्य सादर करून प्राप्त केले. अंकुर विद्या मंदिरच्या चिमुकल्यांनी 'मै राधा तेरी' या गितावर नृत्य सादरीकरणाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. प्रोत्साहनपर अश्विनी प्ले स्कुल, उज्ज्वल बालक मंदीर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा, कारधा, शासकीय अंधविद्यालय भंडारा, नूतन कन्या शाळा, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, संत शिवराम शाळा, सेंट पॉल स्कुल, नूतन महाराष्ट्र विद्यालय यांची निवड करण्यात आली. उत्कृष्ट निवेदक स्पर्धेत सनफ्लॅग शाळेचे कृतिका सुर व खुशी ठोंबरे यांच्या जोडीला प्रथम, अंकुर विद्या मंदिरची अरहंम सिद्धिकी व स्कुल आॅफ स्कॉलरचा अश्रुत रामटेके संयुक्तरित्या द्वितीय तर जेसिस कॉन्व्हेंटची रक्षीता बत्रा तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. प्रोत्साहनपर अनुष्का तिडके, अंजनेय सेलोकर यांची निवड झाली. उपस्थित दर्शकांमध्ये प्रश्नोत्तराची फेरी घेणारा रॉयल पब्लिक स्कुलचा अमेय भोयर याला विशेष पुरस्कारासाठी निवडण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका ईरा शर्मा, कार्यालय प्रमुख मोहन धवड, परीक्षक कुणाल माने, सुधन्वा चेटुले, सांस्कृतिक प्रमुख अनिता गजभिये व स्वाती साखरे यांच्या हस्ते बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन कार्यक्रम संयोजक ललित घाटबांधे यांनी तर प्रास्ताविक सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी केले. आभार ईरा शर्मा यांनी मानले. कार्यक्रमासाठी सायन्स करिअर अकॅडमी व कमला डिजीटल स्टुडीओ यांचे सौजन्य लाभले. धनश्री खोत, सायली कलमकर, शशांक रामप्रसाद, तिरज बरडे, रंजीत हाडगे, राखी सूर, सुहासिनी अल्लडवार, मनिषा रक्षिये, मंगला क्षीरसागर यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)