शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

अन् भाऊबीजेला बहिणीच्या नात्याची वीण तुटली

By admin | Published: November 02, 2016 12:44 AM

भावाच्या प्रगतीसह त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणारी बहीण. प्रेमभावनेने करणारी ओवाळणी व औक्षणाचा ....

पोलीस दलात जाण्याचे स्वप्न राहिले अपुरे : ट्रकने दिली होती धडक, उपचारादरम्यान सोडला श्वासमोहाडी : भावाच्या प्रगतीसह त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणारी बहीण. प्रेमभावनेने करणारी ओवाळणी व औक्षणाचा पारंपरिक भाऊबिजेच्या उत्सवालाच धाकट्या बहिणीची वीण तुटून पडली. भाऊबिजेला असा दुदैवी क्षण बहिणीच्या वाट्याला आली. आज भाऊ बिजेला भावाचे अखेरचे औक्षण करण्याचा दु:खद प्रसंग बहिणीच्या नशिबी आल्याची घटना बोथली या गावी घडली.'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योतीओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची माया'या गीताप्रमाणे दिवाळीतील भाऊबीज म्हणजे बहीण-भावाचा नात्याची वीण घट्ट करणारा सण. पण, या सणाच्याच दिवशी परलोकी गेलेल्या भावाला साश्रूनयनांनी बहिणीला ओवाळणी घालण्याचा हृदयद्रावक प्रसंग ओढवला आहे. बोथली येथील प्रभू कुकडे यांचा लहान कुटूंब, एक मुलगा मुलगी असा परिवार. अतिशय सामान्य कुटूंबात जन्मलेला आचल लहानपणापासून हुशार होता. शिक्षक बनण्याचे स्वप्न बघत तो बेरोजगार झाला. पण, तो खचला नाही. आपल्या कुटूंबाचा आधारवड होण्याची तीव्र जीद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने डी.एड., बी.एड., बी.ए., आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या शोधासाठी तो दररोज वर्तमानपत्र वाचायचा. असाच नित्याप्रमाणे २३ आॅक्टोबर रोजी भडके यांच्या पानटपरीवर वर्तमानपत्र वाचत होता. सर्व लक्ष वर्तमानपत्र वाचनात केंद्रीत करणाऱ्या आचलला माहित नव्हते काळ आपल्यासमोर येईल. तुमसरकडून येणारा एक ट्रक भडके यांच्या पानटपरीत शिरला. जी लोक रिकामी बसली होती ती पळून गेली. मात्र वर्तमानपत्र वाचणाच्या धुंदीत असणाऱ्या आचलला काही कळण्याआधी ट्रकने धडक दिली. त्याच्या पाय व डोक्याला जबर दुखापत झाली. त्याला नागपूर येथे एका खाजगी रूग्णालयात नेण्यात आले. त्याच्या डोक्याची व पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आठवड्यापासून त्याच्यावर उपचार सुरूच होता. अखेर मात्र जीवन मृत्यूच्या झुंजीत आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. २६ वर्षीय आचल हा आपल्या भावी आयुष्याचे रंगवित होता. आपल्या कुटूंबाच्या सुखासाठी नोकरी मिळविलीच पाहिजे, असा त्याने निश्चय केला होता. शिक्षकाच्या नोकर भरतीवर असलेली बंदीमुळे तो दुसऱ्या क्षेत्राकडे वळला. त्याने पोलीस दलात जाण्यासाठी भंडारा येथे शिकवणी लावली होती. स्वकर्तृत्वाने पोलीस बनण्याचे स्वप्न बघत असताना त्याच्या नशिबी दुर्देव आले. त्याच्यावर रूग्णालयात महागडे उपचार झाले. पण, तो परत सामान्य स्थितीत येण्यासाठी झुंजला... अखेर तो जीवनाच्या या प्रवासात हरला. अन् भाऊबीजेच्या दिवशी त्याचे स्वप्ने मातीमोल ठरले.भावा-बहिणीचे अतूट नाते व प्रेमसंवर्धन करण्याचा भाऊबिजेच्या दिवशी बहिणीला अखेरचे निशब्द ओवाळणी करण्याचा दिवस बघावा लागला. जीवनात आधार देणारा, सोबत चालणारी, योग्य दिशा व मार्ग दाखविणारा, दु:खात सहभागी होणारा सुखात सामावून घेणारा व गरीबीत लढण्याचे सामर्थ्य देणारा बहिणीचा थोरला भाऊ औक्षण व ओवाळणी करण्याच्या दिवशीच परलोकाच्या स्वाधीन झाला. धाकट्या बहिणीच्या मायेचा वीण भाऊबिजेलाच तुटावी, यापेक्षा दुदैवी प्रसंग आणखी कोणता असू शकेल. आचल कुकडेच्या जाण्याने कुकडे कुटूंबात निर्माण होणारा आधारवडच कायमचा कोमजल्याने गावात शोककळा पसरली आहे. प्रभू कुकडे यांची लेक नागपूर येथे एमएससी करीत आहे. आचलची बहीणच आता आई-वडिलांची छत्रछाया बनणार आहे. (तालुका प्रतिनिधी)