शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

-आणि ‘तिच्या’ स्वागताकरिता उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 10:25 PM

दिल्लीच्या मैदानावर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या महिला चमूत अग्रस्थानी असलेली भंडारा जिल्ह्याची कन्या सुषमा कुंभलकर हिने शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आटोपून नुकतेच ती सुट्यानिम्मित्त स्वगावी परतली.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकावर सुषमाचे जंगी स्वागत : बेटाळासह नजीकच्या गावातील नागरिकांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतवरठी : दिल्लीच्या मैदानावर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या महिला चमूत अग्रस्थानी असलेली भंडारा जिल्ह्याची कन्या सुषमा कुंभलकर हिने शिरपेचात मानाचा तुरा रोवला. प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम आटोपून नुकतेच ती सुट्यानिम्मित्त स्वगावी परतली. त्यावेळी बेटाळा येथील नागरिकांनी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत केले. आपल्या लाडक्या कन्येच्या स्वागतासाठी बेटाळा येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने एकत्रित झाले होते.प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथील राजपथवर बुलेट स्टंटचे चित्तथरारक प्रदर्शन सादर करणाºया सीमा सुरक्षा दलाचे नेतृत्व बेटाळा येथील सुषमा हिच्याकडे होते. या चित्तथरारक बुलेट स्टंटमध्ये महाराष्ट्रातील तिन मुली होत्या. यात बेटाळा येथील सुषमा शंकर कुंभलकर हिचा समावेश होता. दिल्ली दरबारी प्रजासत्ताक दिनी प्रतिनिधित्व करणारी सुषमा ही पहिली मुलगी आहे. तिच्या समावेशामुळे एका क्षणात बेटाळा गाव प्रकाशझोतात आला.शंकर कुंभलकर बेटाळा येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. आई विमल ही घरकाम करून मजूरीचे काम करीत असते. अशातच मुला-मुलींचे शिक्षण त्यांनी कसेबसे पूर्ण केले. कुंभलकर यांना दोन मुले असून सुषमा ही एकुलती मुलगी आहे. सुषमाने वर्ग १ ते ७ वी पर्यतचे शिक्षण जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा बेटाळा येथे पुर्ण केले. त्यानंतर इयत्ता ८ ते १० वी श्रीराम विद्यालय बेटाळा येथे तर, पुढे इयत्ता ११ वी १२ वरठी येथील नवप्रभात विद्यालयात तिचे शिक्षण झाले. त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) भंडारा येथे सीओई इलेक्ट्रानिक्सचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पूणे येथील टाटा मोटर्स येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. पुण्यात काम करत असतानी सिमा सुरक्षा दलाच्या निवडीसाठी तिने प्रयत्न केला. लहान वयात फौजी बनण्याचे स्वप्न पाहणाºया सुषमाने आपली निवड व्हावी याकरिता अभ्यासोबरोबर, शारिरीक शिक्षणाचा सराव सुरू केला होता.अखेर राजस्थानमध्ये बिकानेर सेक्टर १६ बटालियनमध्ये तिची निवड करण्यात आली. त्यानंतर ग्वाल्हेर, टेकापूर, बीएसाएफ कॅम्प येथे सीमाभवानी टीममध्ये ४८ मुलींच्या चमूत बुलेट स्टंट कोर्स करून प्रशिक्षण घेतले. विशेष म्हणजे सुषमाला लहान असताना सायकलची भिती वाटायची. मात्र, आता ती बुलेट स्टंट करून भारतीय प्रजासत्ताक दिनी राजपथवर पथसंचलन कवायतीत दिसली. एकंदरीत लहानपणापासूनच भारत देशाच्या रक्षणाकरिता जाण्याची सुषमाची इच्छा असल्याने तिने ते सिध्द करून दाखविले हे उल्लेखनीय.प्रथमच बीएसएफच्या मुलींना सिमा भवानी टिममध्ये बुलेट स्टंट या चित्तथरारकाचे प्रदर्शन करण्याची संधी देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्री यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर राजपथवर येथे संपूर्ण देशातील कवायतीचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्यात सुषमा ही कॅप्टनसोबत स्टंट मिनी लोटस चालविले होते.तिच्या आगमना प्रित्यर्थ जोरदार स्वागत करून वरठी ते बेटाळा अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बेटाळाचे सरपंच रामसिंग बैस, संजय मिरासे, एकलारीचे माजी सरपंच पुनम बालपांडे, वीरेंद्र ठोंबरे, राजेंद्र बनकर, प्रकाश तितिरमारे, दिनेश ईश्वरकर, सुलोचना राऊत, वैशाली चौधरी, आरती राऊत, रूप बनकर, इंदिरा शेंडे, विमल इमलकर, पोलीस निरीक्षक माया चाटशे , एम. एम. कानेटकर, ओम उषा दीदी, गजानन कुंभलकर, विनायक भांडारकर, ताराचंद समरीत, रामा ठोंबरे, हरिदास ठोंबरे, अशोक पवनकर, विठ्ठल इलमकर, संजय भुरे, नितीन समरित आदी उपस्थित होते.