लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : चित्रपट व कथा कथानकांमध्ये विहीर किंवा रस्ता चोरीला गेलेला असल्याचे आपण ऐकले व पाहीले आहे. माञ आता प्रत्यक्षातच रस्ते व विहीरी चोरीला जात असून, असाच काहीसा प्रकार लाखांदुर नगरातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये समोर आला आहे.येथील महादेव मंदीर ते वडसा - साकोली रोड मध्ये ले-आऊट पाडण्यात आलेल्या नकाशावर पांदन रस्ता दाखवित असून, तलाठ्यानी पांदन रस्ता असल्याचा नकाशा देखील दिलेला आहे. तलाठी कार्यालयातुन दुसऱ्यांदा घेतलेल्या नकाशावर चक्क पांदन रस्ताच गायब झालेला आहे.लाखांदूर नगरातील प्रभाग क्रमांक ११ साईनाथ काँलनी म्हणून सर्वञ परिचित असलेल्या परीसरात वास्तव्यास असलेले राजेंद्र मंगरू बुरडे हे प्रशांत विद्यालय भागडी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असून, त्यांनी साईनाथ कॉलनी येथील गट नं. ११०३ ची १६ आर पडीत शेतजमिनीत विकत घेतली व पांदन रस्त्यांच्या चार फुट जागेत राहत्या घराच्या आवारभिंतीचे काम केले. गट नं. ११०३ ची १६ आर जमिन पांदन रस्त्यांतच गेली असतांना पांदन रस्ता हा रहदारीचा नाही म्हणून तलाठी कार्यालयातुन सातबारा व नमुना अ हस्तगत केला आहे.सन १९९७ ला ले - आऊट पाडण्यात आले होते. यामध्ये शेतकरी कृषी केंद्रासमोरून जुना बस स्टॉप महादेव मंदिरापर्यंत पांदन रस्ता असून, इजिएस मधुन सन २००२ ला मातीकाम देखील करण्यात आले आहे. मात्र राजेंद्र बुरडे यांनी अतिक्रमण करून भुमी अभिलेख कार्यालयाकडून दि. १५ जुन २०१८ ला मोजनी करून घेतली आहे. मोजनी करतेवेळी नगरपंचायत कार्यालय, बांधकाम विभाग व इतरांना देखील नोटीस दिले असल्याने यावेळी सर्व उपस्थित होते. भुमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचा?्यानी एकाच बाजुने मोजनी केली आहे. नगरपंचायतला अस्तित्वात असलेले रोड ६०० मीटर माज्या मालकी हक्काची असून येथुन रहदारीचा मार्ग नाही असे खडसावून कोर्टात जाण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक नरेश खरकाटे यांच्या सोबत तलाठी कार्यालयात जाऊन सन १९९२ च्या तलाठी रेकार्डची चौकशी केली असता १९९२ नुसार प्राप्त झालेले नकाशे सन १९९६, २०११ व २०१८ आजपावेतो रेकार्डला रस्त्यांची नोंद मात्र आहे.सदर प्रकरणात तलाठ्यांचा कसल्याही प्रकारचा दोष नाही. कारण नकाशे तयार करण्याच काम हे भुमी अभिलेख कार्यालयाचे आहे. या प्रकरणाबाबत भूमी अभिलेख कार्यालयाला सांगितले आहे.- संतोष महले, तहसीलदार लाखांदूर.
अन् मातीकाम झालेला 'तो' रस्ताच चोरीला गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 9:53 PM