आॅनलाईन लोकमतमोहाडी : ‘भंडारा...भंडारा... ताई भंडारा आहे काय. या इकडं.. बसा..’ असा आवाज आज सकाळपासून मोहाडी बस स्थानक चौकात थांबला होता. मुख्यमंत्र्यांच्या येण्यामुळे त्या गाड्यावर अघोषित बंदी आणल्या गेल्योन भंडारा-तुमसर या मार्गावर त्या प्रवासी गाड्या धावल्याच नाहीत.तुमसर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती. भंडारा- तुमसर या मार्गाने मुख्यमंत्री येणार असल्याने त्याप्रवासी वाहक गाड्या रस्त्यावर आल्या नाहीत. वाहतुकीला अडथळा किंबहूना सगळं काही व्यवस्थीत आहे हा दाखविण्याचा अटापिटा पोलीस विभागाकडून करण्यात आला. पोलीस विभागाच्या पाठबळामुळेच प्रवासी कोंबून नेणाºया गाड्या सकाळपासून धावतात. स्वाभाविक पोलीस विभागाची अर्थपूजा होत असल्याचे त्या अ(वैध) गाड्या रस्त्याने धावत असतात. तथापि, आज मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने त्या गाड्यांना चालकांनी घरीच विश्रांती दिली. बेरोजगारांनी अर्थाजनाचा प्रवासी वाहतुक करण्याचा मार्ग निवडला. पण, त्यांच्या श्रमातून हिस्सा घेण्याचा प्रीााग पोलीस खात्यांनी पाडला आहे. महिन्याच्या कमाईतून काही हिस्सा पोलीस विभागाकडे जातो. तरीही त्याच्या मागे करकरी लागल्याच असतात.परिवाराचा उदरनिर्वाह गाडींची देखभाल, पोलीस विभागाची पूजा यातून जे काही शिल्लक राहते तीच गाडी चालकांची खरी कमाई असते. परंतु आजचा दिवस कोरा गेला. धावणाºया गाड्या घरी थांबल्या. आजची कमाई उद्यावर गेली. रस्त्यावर केवळ एसटीच गाड्या धावतात ही दाखवायची संधीही पोलीस खात्याला मिळाली.अवैध प्रवासी गाड्या इथल्या रस्त्यावर धावत नाहीत. सगळं काही दाखविण्याचा खटाटोप पोलिसांनी सिध्द करुन दाखविला. या कारभारातून पोलीस खात्याची लाखाची मुठ झाकली गेली. तथापी, आज सकाळपासून अनेक प्रवाश्यांना बससाठी ताटकळत उभे राहावे लागले होते.
अन् प्रवासी गाडी धावलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 10:24 PM
‘भंडारा...भंडारा... ताई भंडारा आहे काय. या इकडं.. बसा..’ असा आवाज आज सकाळपासून मोहाडी बस स्थानक चौकात थांबला होता
ठळक मुद्देएक दिवस बंदी : पोलिसांची झाकली मूठ