शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
3
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
4
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
5
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
7
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
8
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
9
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
10
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
11
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
12
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
13
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
14
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
15
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
16
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
17
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
18
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
19
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
20
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर

अन् बँकेत चोरीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:20 PM

साकोली तालुक्यातील एकोडी येथे स्टेट बँकमध्ये रविवारच्या रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. येथील बाजार चौकात एस.बी.आय. बँक असून स्टेट बँकेचा एटीएम सुद्धा आहे. हा संपूर्ण परिसर गर्दीचा असून येथून ग्रामस्थ ये-जा करीत असतात.

ठळक मुद्देएकोडी येथील स्टेट बँकेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कएकोडी : साकोली तालुक्यातील एकोडी येथे स्टेट बँकमध्ये रविवारच्या रात्री चोरट्यांनी चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. येथील बाजार चौकात एस.बी.आय. बँक असून स्टेट बँकेचा एटीएम सुद्धा आहे. हा संपूर्ण परिसर गर्दीचा असून येथून ग्रामस्थ ये-जा करीत असतात.घटनेच्या रात्री चोरट्यांनी बँकेलगत असलैल्या जि.प. हायस्कूलच्या मागच्या बाजुने बँकेतील भिंतीला भगदाड पाडून बँकेत प्रवेश केला. चोरट्यांनी अगोदरच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे केबल वायरकापले. त्यामुळे बँकेतील कॅमेरे बंद पडले. चोरट्यांनी भिंत फोडून व तिजोरी रूममध्ये प्रवेश केला. परंतु खुप प्रयत्न करूनही तिजोरी उघडण्यात चोरांना अपयश आले. त्यांनी बँकेच्या मुख्य प्रवेश द्वाराचे कुलूप फोडले. एटीएम मशीनमध्ये जाऊन एटीएम मशीनची तोडफोड केली. परंतु मशीनमधून चोरट्यांना पैसे काढता आले नाही. शेवटी चोरट्यांनी जनरेटर रूमचा कुलूप फोडून त्यामध्ये एटीएम मशीनचा टपरा नेवून फेकला. उल्लेखनीय म्हणजे, ही बँक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.सकाळी येथील ग्रामस्थ जागे झाल्यावर हा संपूर्ण प्रकार त्यांच्या लक्षात आला. बँकेत कंत्राटी पदावर काम करणार व्यक्ती कोल्हे यांनी घडलेला प्रकार शाखा व्यवस्थापक वसंता मेश्राम यांना भ्रमणध्वनी वरून कळविला.वसंता मेश्राम यांनी पोलीस पथकाला सुचना देऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक पिपरेवार, उपनिरीक्षक रायपुरे, एलसीबी पथकाचे मानकर यांचे श्वान पथक, फिंगर प्रिंट आदी पथकाद्वारे शोध मोहिम सुरू करण्यात आली.पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्हयेथील बाजार चौकात असलेल्या स्टेट बँकमध्ये जी चोरीची दुर्देवी घटना घडली त्याच इमारतीत येथील पोलिस चौकी आहे. म्हणजेच शेजारची बँकेत चोरी होते व याला लागूनच असलेल्या पोलीस प्रशासनाला त्यावेळी काहीच जाग येत नाही. यावरून पोलिसांच्या कर्तव्य निष्ठेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.रविवारच्या रात्री झालेल्या या प्रकारात रूपयांची चोरी झाली नसली तरी इतर किरकोळ नुकसान झाले आहे.-वसंता मेश्राम,व्यवस्थापक, स्टेट बँक, एकोडी.