शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
2
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
4
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
5
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
6
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
7
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
8
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
9
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
14
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
19
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
20
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

अंगणवाडी इमारत जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 10:14 PM

गोंडीटोला येथील अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. यामुळे बालकांचे जीव धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देगोंडीटोला येथील प्रकार : बालकांचा जीव धोक्यात

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : गोंडीटोला येथील अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे. इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही. यामुळे बालकांचे जीव धोक्यात आले आहे. भिंतीला भेगा पडल्या असून नवीन इमारत मंजुर करण्याची मागणी पालक व गावकऱ्यांनी केली आहे.गोंडीटोला गावात जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले. ही इमारत जुनी असून भिंतीला भेगा पडल्या आहे. या अंगणवाडीत बालके भितीच्या वातावरणात विद्यार्जन करित आहेत. स्लॅब पावसाळ्यात गळत असतो. सतत पाऊस राहत असल्याने बालकांना अंगणवाडीत बसविणे जिकरीचे ठरत आहे. गावात दोन अंगणवाडी केंद्र आहेत. एका अंगणवाडीला स्वतंत्र इमारत नाही. एकमेव अंगणवाडीची जीर्ण इमारत आहे.या इमारतीची सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला आहे. छताची दुरूस्ती करण्यात आली असली तरी निधी व्यर्थ खर्च करण्यात आला आहे. याशिवाय अंगणवाडीत बैठकीची सुसज्ज व्यवस्था नाही. यामुळे बालकाचे विद्यार्जन प्रभावित ठरत आहे. इमारतीच्या दुरवस्था संदर्भात बालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतु प्रशासन ऐकायला तयार नाही. इमारतीची अवस्था कोंडवाडाप्रमाणे झाली आहे.गावात नवीन अंगणवाडी इमारत मंजुर करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. इमारतीची दुरावस्था असल्याने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसाची अध्यापनाची मानसिकता नाही.या अंगणवाडीत ग्रामपंचायतचे मार्फत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी विजेवर सुरू होणारा ‘आरो’ देण्यात आला असला तरी या आरोचे एक ग्लास पाणी बालकांनी प्यायलेले नाही.अंगणवाडीत विजेची सोय नसल्याने ‘आरो’ शोभेची वास्तु ठरली आहे. ‘आरो’ खरेदीत शासकीय निधीचा चुराडा करण्यात आला आहे. निम्याहून अधिक अंगणवाडीत विजेची सोय नाही. गावात अंगणवाडी इमारत मंजुर करण्याची मागणी आहे.गोंडीटोला येथील अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून बालकांना संभावित धोका असल्याची माहिती आहे. नवीन इमारत मंजुरी करिता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.-प्रेरणा तुरकर,जिल्हा परिषद सदस्य, बपेरा.