शासनाचा योग्य निर्णय न झाल्यास जुलै महिन्यात मोबाइल परत करणार असल्याचे जिल्हा अध्यक्ष सविता लुटे यांनी सांगितले. पोषण ट्रॅकरबाबतच्या सर्व अडचणी सुटेपर्यंत अंगणवाडी कर्मचारी बाकीची सर्व कर्तव्ये पार पाडतील. परंतु पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्याचे काम करणार नाहीत. शासनाने नमूद केलेल्या तसेच नंतर उद्भवू शकणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्याचा निर्णय मागे घ्यावा, असेही शासनाला कळविले आहे. प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांना लेखी देऊनसुध्दा वारंवार त्रास देत आहेत. यासाठी कायदेशीर कार्यवाही करावी. ही लढाई शासनासोबत असून कार्यालयासोबत नाही, असेही सांगण्यात आले आहे. यावेळी उज्ज्वला रामटेके, मीरा चकोले, बबिता मेश्राम, सरिता बागडे, अमिता गोस्वामी, अश्विनी कापगते, रंजना ढेंगे, मोहनी लांजेवार, प्रियनंदा सेलोकार, जिजा शेंबे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
जाचक अटींमुळे अंगणवाडी कर्मचारी मानधनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:23 AM