लाखनी : स्थानिक एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनद्वारे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी केंद्राची वेळ निश्चित करणे, मुलाच्या आॅनलाईन नोंदणीकरीता घेण्यात आलेले पैसे परत करणे, लाखनी व पालांदूर बीट सन २०१० ते २०१२ पर्यंत पालांदूर बीट २०१० व नोव्हेंबर, डिसेंबर व २०१२ चे पूर्ण वर्षीचे प्रवास भत्ता देण्यात यावा, २०१० मधील बचत गटाचे इंधन बिल, अंगणवाडी केंद्राचे भाडे, मिनी अगंणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडी केंद्रात करण्यात यावे. यात खुनारी, घोडेझरी, वाकल, गराडाटोला, गुरढा, केसलवाडा टोला याचे प्रस्ताव पाठविण्यात यावे, गडेगाव येथील अतिरिक्त मानधन देण्यात यावे, सेवानिवृत्त झालेल्या, मृत्यु पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात यावा, बचतगट आहार बंद झाल्यावर सेविकांना आहार शिजविण्यास सक्ती करू नये. तसेच इंदिरा गांधी मातृ सुरक्षा योजनाचे सक्रिय भत्ता देण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन बाल विकास प्रकल्प अधिकारी मिलिंद बडगे यांना आयटकचे जिल्हा अध्यक्ष सविता लुटे, राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, कार्याध्यक्ष हिवराज उके, उमेश खाळसे, पर्यवेक्षक योगिनी भांडारकर, मेघा काळे, सुधा कालेश्वर, वंदना ओसवाल, मंदा टिचकुले, रेखा डोंगरे, आयटकचे पदाधिकारी आशा रंगारी, लिलावती बडोले, शालिनी तुमसरे, ललीता खंडाईत, कमल कमाने, अर्चना खरवाडे, मोद्रिनी लांजेवार, मिरा चकोले, सिमा खंडेवार, बबीता मेश्राम, मंदा गोमासे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील अंगणवाडी, मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 12:35 AM