शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अन् संतप्त विद्यार्थ्यांनी बसची काच फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:00 PM

मानव विकास संसाधनच्या विद्यार्थ्यांच्या बसमध्ये मुलीऐवजी प्रवाशांची वाहतूक करून ये-जा करणाºया विद्यार्थिनींना तसेच विद्यार्थ्यांना नेहमीच डावलल्या जात आहे.

ठळक मुद्देसाखळी येथील प्रकार : गावकºयांचा तासभर रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मानव विकास संसाधनच्या विद्यार्थ्यांच्या बसमध्ये मुलीऐवजी प्रवाशांची वाहतूक करून ये-जा करणाºया विद्यार्थिनींना तसेच विद्यार्थ्यांना नेहमीच डावलल्या जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एसटी बसला दगड मारून काच फोडली. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील साखळी बसस्थानकावर घडली. घटनास्थळावर गावकºयांनी एक तास रस्ता रोखून धरल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती.रस्ता तिथे एसटी याप्रमाणे खेड्यापाड्यातून सावित्रीच्या लेकींना तालुक्याच्या ठिकाणी आणले जाते. मात्र आगार प्रमुखाच्या अटेलतट्टू कारभारामुळे 'त्या' निळ्या बसमध्ये प्रवासीही आणणे सुरू झाले. त्यामुळे नाकाडोंगरी रस्त्यावरील ४०० च्यावर विद्यार्थी प्रभावित झाले आहे. लांब पल्ल्यावरून ये-जा करणारे प्रवासी व विद्यार्थ्यांमुळे बसमध्ये प्रवासी कोंबल्या जाते. त्यामुळे पवनारा, साखळी, आंबागड, मिटेवानी, मेहेगाव येथील विद्यार्थ्यांकरिता बस थांबविली जात नाही.परिणामी विद्यार्थ्यांचा मोठा शैक्षणिक नुकसान होत आहे. घटनेच्या दिवसी लोभीवरून मानव विकास संसाधनची बस क्रमांक एमएच ०७ ए ९५२३ ही सकाळी ९.३० च्या सुमारास प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांना घेवून निघाली. चिचोली हे गाव येईपर्यंत ती पुर्णत: प्रवाशांनी भरगच्च भरली होती. साखळी बस स्थानकावर बस थांबवून केवळ दोन ते चार विद्यार्थ्यांना बसमध्ये वाहकाने चढविले. उर्वरित विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतलेच नाही. त्यामुळे आजही शाळा बुडणार असल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी बसच्या मागच्या काचावर दगड मारून काच फोडले. त्यामुळे गावकºयांनी एक तास रस्ता रोखून धरला होता. जिल्हा वाहतूक अधिकाºयांच्या मध्यस्थीने वाद निवडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदीप टाले, पं.स. सदस्य मुन्ना फुंडे, पं.स. माजी सदस्य प्रकाश पारधी, मारोती ठाकरे, रमेश बोपचे, पिंटू पटले, दुर्गाप्रसाद राहांगडाले, आनंद पटले, संजय हरदे, लक्ष्मण पटले, विनोद मरस्कोल्हे, ढेकल पटले, धासीलाल रहांगडालेसह शेकडो नागरिक उपस्थित होते.नाकाडोंगरी रोडवरील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता २७ सप्टेंबरपासून नवीन बस फेरी सुरू करण्यात येत आहे.-सीईओ काळनेक, डी.टी.ओ.भंडारा