मुख्यमंत्र्यांना निवेदन : शोध यात्रा अभ्यास मंडळाची मागणीतुमसर : भंडारा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगेत वसलेला आंबागड किल्ला सध्या दुर्लक्षित असून या किल्ल्याला पर्यटन स्थळ 'अ' दर्जा घोषित करण्याची मागणी ऐतिहासिक धरोहर शोध यात्रा भंडारा-गोंदिया जिल्हा अभ्यास मंडळाने तहसिलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली.तुमसर तालुक्यात राजे बख्त बुलंद शाह यांनी आंबागड किल्ला तयार केला होता. १८ ते २० व्या शतकातील एक महत्वपूर्ण किल्ला म्हणून विदर्भाच्या इतिहासात त्याचे महत्वपूर्ण स्थान आहे. एकेकाळी, भंडारा, गोंदिया, नागपूर, लांजी, बालाघाट, चंद्रपूर, गडचिरोली या भागाचे प्रशासकीय केंद्र होते. आंबागड किल्ला घनदाट जंगलात मांडत असून महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. राज्य शासनाने दखल घेवून गडकिल्ले संवर्धनाअंतर्गत आंबागड किल्ल्याला 'अ' दर्जा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे परिसरात आदिवासी बांधवांना रोजगार प्राप्त होण्यास मदत होईल. अनेक पर्यटक, शैक्षणिक सहली येथे वळू शकतात. तहसीलदार डी.टी. सोनवाने यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात ऐतिहासिक धरोहर शोध यात्रा अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मुबारक कुरैशी, सचिव प्रा. डॉ. सुनिल चवळेसह इतर सदस्यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
आंबागड किल्ला पर्यटनस्थळ 'अ' दर्जा घोषित करा
By admin | Published: April 02, 2016 12:38 AM